शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत आघाडी ?

By admin | Updated: June 30, 2016 03:09 IST

काँग्रेससोबत आघाडी करणे हिताचे ठरणार असून त्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेणार

ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचे पॅनल होत असल्याने काँग्रेससोबत आघाडी करणे हिताचे ठरणार असून त्याबाबतची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. आघाडीसाठी सध्या काही स्थानिक मंडळी तयार नसली तरीदेखील राणेंच्या आवाहनानंतर राष्ट्रवादी आघाडीसाठी हात पुढे करील, असे संकेत त्यांनी ‘लोकमत’ला दिले.जेमतेम सहा महिन्यांवर येऊ घातलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रवादीत कशा पद्धतीने बदल केले जातील, आघाडी होईल अथवा नाही, रणनीती कशी असेल, सोशल मीडियाचा वापर कसा केला जाईल, अशा काही महत्त्वाच्या विषयांवर परांजपे यांनी माहिती दिली. मागील महिन्यात झालेल्या परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहिली होती. तसेच मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीपासून वेगळी चूल मांडण्याची तयारी काँग्रेसने सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्याबाबत परांजपे यांना छेडले असता त्यांनी सांगितले की, आगामी निवडणुकीत आघाडी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. त्यानुसार, पुढील आठवड्यातच यासंदर्भात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस काहीसे वेगळे वातावरण होते, त्यामुळे दोघांनीही स्वतंत्र निवडणूक लढवली होती. परंतु, आता शिवसेना आणि भाजपाला शह द्यायचा असेल आणि पॅनल पद्धतीत तग धरून राहायचे असेल तर आघाडी करावीच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे राणे यांच्यावर ज्या वेळेस ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली, त्याच वेळेस त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यासंदर्भातील सूतोवाचही केले होते. त्यानुसार, आता राष्ट्रवादीनेदेखील आघाडीबाबत चाचपणी सुरू केल्याचे परांजपे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)>नाराजांची मनधरणी करणार; पक्ष एकसंधपक्षाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी जे नाराज झाले असतील, त्या सर्वांची वैयक्तिक भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचे कामही केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक नगरसेवकाच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली जात आहे. याशिवाय, यापूर्वी सोशल मीडियाच्या जबाबदारीचा अनभुव असल्याने आगामी निवडणुकीतदेखील याचा वापर करून राष्ट्रवादीला एकसंध ठेवले जाईल आणि विकासकामांचा अजेंडा ठाणेकरांपुढे नेला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.