शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन पाडल्याविरोधात मोर्चा

By admin | Updated: July 6, 2016 21:50 IST

आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस उद्वस्त केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी, १५ जुलैला विधानभवनावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ६ :  आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस उद्वस्त केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी, १५ जुलैला विधानभवनावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळा येथील राणीबागेहून मोर्चाची सुरूवात होणारअसून भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर, कॉम्रेड मिलिंद रानडे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर हे नेते मोर्चाचे नेतृत्त्व करणार आहेत. आंबेडकर भवन पाडणे म्हणजे देशातील चळवळी संपवण्याचा प्रयत्न असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान, आंबेडकर भवनाचा वाद आंबेडकरी नेत्यांनी माध्यमांवर ज्या पद्धतीने हाताळला, त्यामुळे समाजाच्या प्रतीमेस तडा गेल्याची प्रतिक्रिया व्यथित आंबेडकरी युवाने मांडली आहे. आंबेडकरी नेत्यांनी या प्रकरणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी, या मागणीसाठी काही तरूण बुधवारी दुपारी दादर येथील चैत्यभूमीजवळ जमले होते.

यावेळी जमलेल्या सर्व युवांनी हातात घोषणा फलक घेऊन शांततेच्या मार्गाने निदर्शने करत ध्यानधारणाही केली. आंबेडकर भवन पाडणाऱ्यांना कडक शासन व्हावे, बुद्धभुषण प्रिंटींग प्रेस हेरिटेज वास्तू जाहिर करावी, शिवाय त्याठिकाणी रोहित वेमुला स्मृती दालन निर्माण करावे आणि बाबासाहेबांच्या वारसदारांना ट्रस्टमध्ये सन्मानाचे स्थान द्यावे, अशा विविध मागण्यागी तरूणांनी यावेळी केल्या. दरम्यान, व्यथित आंबेडकरी युवा या समूहाने समाजाच्या भवितव्यासाठी मैत्री-संवाद व मध्यममार्गातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन निर्मितीचा संकल्पही यावेळी केला.