ऑनलाइन लोकमतनागपूर, दि.19 - गंमतजंमत करताना झालेला राग मनात ठेवून एकाने आपल्या मित्रावरच धारदार शस्त्राने हल्ला केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री १०.१५ वाजता ही घटना घडली.सूरज ऊर्फ पप्पू नीरंजन काळे (वय २६) असे जखमीचे नाव असून, पप्पू मिश्रा (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून मैत्री होती. काही दिवसांपूर्वी गंमतजंमत करताना सूरजच्या बोलण्याने पप्पू दुखावला गेला. त्यावरून त्यांच्यात किरकोळ वादही झाला. त्यावेळी आरोपीने सूरजच्या घरात शिरून मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर प्रकरण संपले असे समजून सूरज तो वाद विसरला. सोमवारी रात्री १०. १५ च्या सुमारास आरोपी पप्पूने सूरजला निर्मलगंगा कॉम्प्लेक्ससमोर चर्चेला बोलविले. सूरजला गप्पात भुलवून कपड्यात लपवून ठेवलेले धारदार शस्त्र बाहेर काढून आरोपी पप्पूने त्याच्यावर हल्ला केला. प्रसंगावधान राखत सूरजने उजवा हात आडवा केल्याने त्याच्या कोपरावर जबर जखम झाली. या घटनेनंतर सूरजने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी पप्पू मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.
मित्र बनला शत्रू
By admin | Updated: July 19, 2016 21:58 IST