शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवारपासून उजनीत पाणी सोडणार

By admin | Updated: January 13, 2016 01:25 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील भिमा आसखेड आणि चासकमान धरणातून १५ जानेवारीपासून उजनी धरणात तीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील भिमा आसखेड आणि चासकमान धरणातून १५ जानेवारीपासून उजनी धरणात तीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार असून, नदीजवळच्या शेती पंपाचा विद्युत पुरवठा किमात सात दिवस खंडीत करण्यात येणार आहे. नदीच्या पात्रातील सर्व केटीवेअर बंधारे भरुन पाणी पुढे सोडले जाणार असल्याने उजनीत किती पाणी पोहोचणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान,आंध्रा व मुळशी धरणांतील दहा टीएमसी पाणी सोलापूरच्या उजनी धरणात सोडण्याचा आदेश आॅक्टोबरमध्ये जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला होता. त्यावरून मोठे रणकंदन सुरू झाले होते. काहींनी निणर्यावरोधात प्राधिकरण व मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. जलसंपत्ती प्राधिकरणाने मागील आठवड्यात भामा आसखेड धरणातून सुमारे दोन टीएमसी व चासकमान धरणातून सुमारे एक टीएमसी पाणी असे एकूण सुमारे तीन टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिलेजिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी सोडण्याबाबतचे नियोजन झाले असून येत्या १५ जानेवारी पासून २२ जानेवारी या कालावधीत दोन्ही धरणांमधून उजनीत पाणी सोडण्यात येणार आहे.