शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच कलाकारांकडून मूकबधिरांना नृत्याचे धडे!

By admin | Updated: November 27, 2014 00:11 IST

समता संस्था : आवाजाशिवाय नृत्याचा आविष्कार

सागर गुजर - सातारा --कानावर ध्वनी पडतच नसल्यानं व्यक्त कसं व्हायचं, असा त्यांच्यापुढील जन्मजात प्रश्न! अंगापिंडानं धडधाकट असणाऱ्या मूकबधिर मुलांना हा प्रश्न वर्षानुवर्षे छळत आलाय. फ्रान्सहून साताऱ्यात दाखल झालेले वालिद घेझ आणि अ‍ॅलिस कॉचेट हे दोघे येथील समता मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये नृत्याच्या कलागुणांची पेरणी करत आहेत.कुरळ्या केसांचा वालिद घेझ हा तरुण आणि त्याची मैत्रिण उंचपुरी अ‍ॅलिस ड्युपाँट कॉचेट हे फ्रान्समध्ये गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक काम करत आहेत. मूकबधिर, मतिमंद विद्यार्थ्यांसाठी हे दोघेही झटून काम करत आहेत. ब्राझीलमध्ये प्रसिध्द असणारा ‘कॅपोरिया’ हा डान्स या दोघांनीही अवगत केला आहे. कॅपोरिया म्हणजे आवाजाशिवाय अथवा ध्वनीशिवाय नाचणे व खेळ खेळणे होय. वर्षापूर्वी हे दोघेही संपूर्ण जगप्रवासाला निघाले. भारतात अपंग विद्यार्थ्यांची स्थिती जाणून घेण्याचे प्रयत्न त्यांनी सुरु केले. मागील आठवड्यापासून त्यांनी समता शिक्षण संस्थेच्या मूकबधिर व मतिमंद विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या विकासासाठी आवश्यक असणारे खेळ व नृत्याचे प्रशिक्षण सुरु केले आहे.ध्वनीशिवाय नाचण्याचे तंत्र मूकबधीर व मतिमंद मुलांना अवगत होऊ लागले आहे. मुलेही त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत. शिक्षकांच्या सोबतीने ही मुले कॅपोरिया हा आगळा वेगळा नृत्यप्रकार शिकू लागली आहेत. मूकबधीर विद्यालयातील मुले स्नेहसंमेलनात तसेच ग्रंथ महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपले कौशल्य नेहमी सिध्द करीत असतात. आता या नव्या तंत्राच्या प्रशिक्षणामुळे त्यांना वेगळी दिशा मिळाली आहे. फ्रान्समध्ये विकसित असलेली चित्रकलाही या मुलांना अवगत व्हावी, या हेतूने रोज चित्रकलाही शिकविली जात आहे.या प्रयोगातून जाईल जडपणाकेवळ ‘अबकड’ हेच केवळ शिक्षण नसून यापेक्षा संगीत, नृत्य या प्रकारातूनही शिक्षण देता येतं, असं फ्रान्सवरुन आलेल्या या पाहुण्यांचं म्हणणे असून हा प्रयोग त्यांनी फ्रान्समध्ये केला आहे. फ्रान्समध्ये अनेक मतिमंद व मूकबधिर मुले रस्त्यावर येऊन गाणी व नृत्य करत असतात. यातून त्यांच्यातील जडपणा जाऊन अवयव आणि मेंदूला चालना मिळू शकते, असं त्यांचं मत आहे. कॅपोरिया डान्सचा हा प्रकार कोणत्याही आवाजाविना शिकता येतो. मूकबधीर मुलांना याचा विशेष उपयोग होणार आहे. मुले या प्रकाराचा आनंद लुटत आहेत.सातारा येथील समता शिक्षण संस्थेतील मूकबधीर व मतिमंद मुलांना नृत्याचे प्रशिक्षण देताना वालिद घेझ आणि अ‍ॅलिस ड्युपाँट कॉचेट.