शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य सेनानी बेलाप्पा पेटकर अनंतात विलीन

By admin | Updated: May 20, 2014 23:52 IST

स्वातंत्र्य सैनिक बेलाप्पा आसाराम आप्पा पेटकर यांचे वृध्दापकाळाने सोमवारी रात्री उपचारादरम्यान चिखली येथे प्राणज्योत मालवली

देऊळगांवराजा : स्वातंत्र्य लढय़ात सक्रीय सहभाग घेतलेले स्वातंत्र्य सैनिक बेलाप्पा आसाराम आप्पा पेटकर यांचे वृध्दापकाळाने सोमवारी रात्री उपचारादरम्यान चिखली येथे प्राणज्योत मालवली त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मंगळवारी दुपारी देऊळगांवमही येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दि.१ जानेवारी १९३१ रोजी जन्मलेले बेलाप्पा पेटकर यांनी ऐन उमेदीच्या काळात गोवा मुक्ती संग्राम या लढयात १९५६ ते १९५८ या काळात लक्षणीय योगदान देशसेवेसाठी अर्पित केले होते. ज्वलंत विचार व देशप्रेमाची ओढ या ध्येयापोटी समाजात जनजागृतीचा वसा त्यांनी शेवटपर्यंत जपला. बेलाप्पा पेटकर यांनी स्वातंत्र्य लढयात केलेल्या कामगिरीची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला होता. स्वातंत्र्य सैनिक पेटकर यांनी प्रारंभी इंग्रजी विषयाचे शिक्षक व नंतर शासकीय नोकरीत प्रवेश करुन दि.५ जुलै १९५६ रोजी जि.प.मराठी प्राथमिक कन्या शाळा सिंदखेडराजा येथे शिक्षक म्हणून रुजू झाले. आणि दि.३0 जून १९८८ रोजी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून सेवानवृत्त झाले. २५ वर्षापासून ते देऊळगांवराजा तालुक्यातील देऊळगांवमही येथे वास्तव्यास होते. ८३ वर्ष वय असलेल्या बेलाप्पा पेटकर यांची प्रकृती साथ देत नव्हती. सोमवारी दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने कुटूंबियांनी त्यांना तातडीने चिखलीला डॉ.सावजी हॉस्पीटलला दाखल केले. उपचारादरम्यान रात्री त्यांचे निधन झाले. मंगळवारी दुपारी देऊळगांवमही येथे स्मशानभूतीत शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडला. जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या वतीने एसडीओ घोडके, पोलिस अधिक्षकांच्या वतीने ठाणेदार हिवाळे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलिस दलाच्या कर्मचार्‍यांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी पेटकर कुटूंबिय, नातलग, राजकीय, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्य सैनिक बेलाप्पा पेटकर यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.