शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

भरबाजारात तंटामुक्तीच्या अध्यक्षावर गोळीबार!

By admin | Updated: August 25, 2016 20:51 IST

कऱ्हाड तालुक्यातील चाफळ येथील आठवडा बाजारात सर्वांसमोर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षावर एकाने बंदुकीतून गोळ्या झाडल्या.

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. 25 : कऱ्हाड तालुक्यातील चाफळ येथील आठवडा बाजारात सर्वांसमोर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षावर एकाने बंदुकीतून गोळ्या झाडल्या. या घटनेने बाजारतळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर बंदूक हातात घेऊन त्याचठिकाणी उभा होता. काही वेळाने घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

विकास बबन साळुंखे (वय ४२) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. ग्रामस्थांनी उपचारार्थ त्यांना कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चाफळ येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास साळुंखे हे सायंकाळी बाजारतळावर आले होते.

आठवडा बाजाराचा दिवस असल्याने त्याठिकाणी मोठी गर्दी होती. त्याचवेळी पाटण तालुक्यातील जाधववाडी येथील वडाप व्यावसायिक जीप घेऊन त्याठिकाणी आला. जीपमधील बारा बोअरची बंदूक हातात घेऊन तो खाली उतरला. विकास साळुंखे त्यांच्या दुचाकीवर बसून काहीजणांशी बोलत असताना पाठीमागून आलेल्या वडाप व्यावसायिकाने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.

त्यामुळे विकास साळुंखे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. ग्रामस्थांनी त्यांना उचलून तातडीने रुग्णालयात हलविले. हल्लेखोर त्याचठिकाणी बंदूक घेऊन उभा होता. काही वेळाने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चाफळ पोलिस दूरक्षेत्रात या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.