शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये फ्री वाय-फायचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 02:28 IST

महापालिकेची निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

मयूर तांबडे,पनवेल- महापालिकेची निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही शहरात निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून प्रलोभने दाखवली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात आल्या असून, यात सर्वच पक्ष आघाडीवर दिसत आहेत. पनवेल शहर महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली व महाराष्ट्रातील २७वी महापालिका असून पालिकेच्या चाव्या आपल्या ताब्यात याव्यात, यासाठी सर्वच राजकीय पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. प्रभाग रचना जाहीर झाली असून, आरक्षणानुसार पक्षांची शोधमोहीम सुरू असून इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचार सुरू केला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा नागरिकांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्वी गृहोपयोगी वस्तू- साड्या वाटप, नळाची जोडणी, मलनि:सारण वाहिन्यांची सफाई आदी आश्वासने दिली जायची. मात्र, आता ही आश्वासने जुनी झाली आहेत. सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांकडून तरु ण पिढीची गरज लक्षात घेऊन वाय-फाय झोन, डेटा कार्ड ही नवीन आश्वासने दिली जात आहेत. सध्या तरु ण पिढीतील मतदारांकडून मात्र सेल्फी पॉइंट, वाय-फाय फ्री झोनची मागणी केली जात आहे. इंटरनेट तसेच स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून केला जात आहे. पनवेल शहरात पहिल्यांदाच मनसेने राजगड या कार्यालयात वाय-फाय सेवा सुरू केली होती. मात्र, वर्षभरातच वाय-फाय सेवेला ग्रहण लागले व सेवा बंद पडली. त्यानंतर श्रीकांत ठाकूर यांनी साईनगर येथे फ्री वाय-फाय सेवा सुरू केली. शेतकरी कामगार पक्षाचे संदीप पाटील यांनी नवीन पनवेलमध्ये एक-दीड महिन्यापूर्वी वाय-फाय सेवा सुरू केली आहे. तर मनसेचे यतीन देशमुख यांनी मराठी दिनाचे औचित्य साधून नुकतीच फ्री वाय-फाय सेवा सुरू केली. खांदा कॉलनीतील मनसेचे इच्छुक उमेदवार अ‍ॅड. संतोष सरगर यांनीही मोफत वाय-फाय सेवा सुरू केली आहे. अन्य इच्छुक उमेदवारदेखील आपापल्या प्रभागात फ्री वाय-फाय सेवा देण्याच्या तयारीत आहेत. (प्रतिनिधी)>मोफत वाय-फाय सुविधेसाठी संबंधित इच्छुक उमेदवारांच्या नावाचा पासवर्ड असतो. त्यामुळे उमेदवाराचा नकळत प्रचारही होतो. सध्या मोबाइलचा वाढता वापर आणि शासनाचे आॅनलाइन सेवा धोरण, तसेच सोशल मीडियाचा वाढता वापर यामुळे फ्री वाय-फाय सेवा हा आकर्षक प्रचाराचा भाग बनला आहे.