शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

डीझेल परताव्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: March 31, 2017 06:50 IST

शासन निर्णयातील डीझेल परताव्याबाबत (सवलतीबाबत) जाचक कलम रद्द केल्याने राज्यातील हजारो मच्छीमारांना फायदा

मनोहर कुंभेजकर / मुंबईशासन निर्णयातील डीझेल परताव्याबाबत (सवलतीबाबत) जाचक कलम रद्द केल्याने राज्यातील हजारो मच्छीमारांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे यांत्रिकी नौकांना लागणाऱ्या हायस्पीड डीझेल तेलावरील विक्रीकराची परिपूर्तता होणार आहे. त्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात एकूण ३६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून मच्छीमार सहकारी संस्थांमधील मच्छीमारांच्या डीझेल परताव्याचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित होता. मात्र शासनाच्या या तरतुदीमुळे राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांना थकीत रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी १९७५ सालापासून संस्थांच्या सोसायटीमधील मच्छीमारांच्या नौकांसाठी लागणाऱ्या डीझेल खरेदीवर परतावा देण्याची योजना अस्तित्वात आली. मात्र १ एप्रिल २००५ पासून राज्यात मूल्यवर्धित करप्रणाली अस्तित्वात आली. तर ३ सप्टेंबर २००५ पासून सदर योजना सुधारित स्वरूपात लागू करण्यात आली. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार नौकांसाठी लागणारे डीझेल हा तमाम मच्छीमारांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मच्छीमार सभासदांसाठी डीझेलचे वितरण हे प्रामुख्याने राज्यातील विविध मच्छीमार सहकारी संस्थांकडून होते. गेल्या पंधरवड्यात शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याकडून जाहीर केलेल्या निर्णयात राष्ट्रीय सहकार विकास नियम (एन.सी.डी.सी.) या योजनेमार्फत बोट बांधलेल्या बोटधारकांचे थकीत कर्ज डीझेल तेल परताव्यातून घेण्याचे आदेश जाहीर झाले होते. परिणामी, राज्यातील मच्छीमार हवालदिल झाले होते. यासंदर्भात वेसावा नाखवा मंडळचे अध्यक्ष देवेंद्र काळे आणि वेसावा मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष जयराज चंदी यांनी आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. लव्हेकर यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे हा महत्त्वाचा विषय सातत्याने मांडून सदर कलम रद्द करण्यास भाग पाडले. त्यामुळे वेसाव्यासह राज्यातील हजारो बोट मालकांचा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया काळे यांनी व्यक्त केली आहे.गेल्या २२ महिन्यांपासून वेसाव्यातील सुमारे ५०० मच्छीमार नौकांचा सुमारे १३ कोटी डीझेल परतावा प्रलंबित आहे. त्यामुळे संबंधित रक्कम लवकर मिळण्यासाठी लव्हेकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी काळे यांनी केली आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून मच्छीमार सहकारी संस्थांमधील मच्छीमारांच्या डीझेल परताव्याचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित होता. मात्र शासनाच्या या तरतुदीमुळे राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांना थकीत रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ एप्रिल २००५ पासून राज्यात मूल्यवर्धित करप्रणाली अस्तित्वात आली. तर ३ सप्टेंबर २००५ पासून सदर योजना सुधारित स्वरूपात लागू करण्यात आली.