शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

टीएमटीमधून अंध, अपंगांना मोफत प्रवास

By admin | Updated: September 20, 2016 03:50 IST

शहरातील अंध तसेच अपंग व्यक्तींना आता ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

ठाणे : शहरातील अंध तसेच अपंग व्यक्तींना आता ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामुळे परिवहनच्या तिजोरीवर ३६ लाख ४० हजारांचा वार्षिक बोजा पडणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला सोमवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, ही तूट भरून काढण्यासाठी महापालिकेकडून अनुदान घेण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. शहराच्या विविध मार्गांवर टीएमटीच्या बसेस धावतात. यामधून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा आहे. त्यामध्ये अंध व अपंग व्यक्तींचाही समावेश आहे. काही वर्षांपूर्वी परिवहन सेवेने अशा व्यक्तींना प्रवासी भाड्यात सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार अंध, अपंग, विद्यार्थी, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक यांना सवलत देण्यात येते. या सवलतींमुळे परिवहन प्रशासनावर वर्षाला दोन कोटी रु पये इतका आर्थिक बोजा पडतो. सवलतीच्या दरानुसार अंध व अपंग व्यक्तींना प्रवासी भाड्यात ५० टक्के इतकी सवलत देण्यात येत असून या सवलतीचा लाभ केवळ २८५ नागरिक घेत आहेत. दरम्यान, या नागरिकांना प्रवास मोफत करण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी काही महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेपुढे मांडला होता. त्यास सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली असून या निर्णयानुसार टीएमटीवर ३६ लाख ४० हजारांचा वार्षिक बोजा पडणार आहे. असे असले तरी या सुविधेमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिवहन सेवेवरील आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता आहे, असा परिवहन प्रशासनाचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)>लाभार्थी वाढणार?टीएमटीचे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने अंध व अपंग व्यक्तींच्या मोफत प्रवासामुळे टीएमटीवर पडणारा आर्थिक बोजा महापालिकेकडून अनुदान स्वरूपात घेण्याचा पर्याय सुचवला होता.