शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणापासून वंचितांसाठी आता मुक्त विद्यालय मंडळ

By admin | Updated: July 15, 2017 05:29 IST

शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने आज घेतला

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुक्त विद्यापीठांच्या धर्तीवर शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या आबालवृद्धांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने आज घेतला. या मंडळांतर्गत होणाऱ्या परीक्षांना नियमितपणे घेण्यात येणाऱ्या पाचवी, आठवी, दहावी आणि बारावी इयत्तेच्या परीक्षांची समकक्षता असेल. या मंडळाच्या माध्यमातून औपचारिक शिक्षणाला पूरक आणि समांतर अशी शिक्षण पद्धती लागू केली जाणार आहे. मुलामुलींसह शिक्षण घेऊ इच्छिणारे प्रौढ व्यक्ती, गृहिणी, कामगार या सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाईल. त्यात सोयीनुसार अध्ययनाची सवलत असेल. अभ्यासक्रमात लवचितकता राहील. व्यावसायिक शिक्षण दिले जाईल. दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था असेल. इयत्ता पाचवीच्या समकक्ष शिक्षणासाठी विद्यार्थ्याचे वय किमान दहा वर्षे असावे, पूर्वी औपचारिक शाळेत गेला असल्यास तेथील शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे, अशा शाळेत गेलाच नसेल तर स्वयंघोषित प्रमाणपत्र द्यावे अशा अटी असतील. इयत्ता आठवीच्या समकक्ष शिक्षणासाठीचे वय किमान १३ वर्षांचे राहील तर कमाल वयाला मर्यादा नसेल. इयत्ता दहावीच्या समकक्ष शिक्षणासाठी वयाची किमान मर्यादा १५ वर्षे असेल. कमाल अट नसेल. किमान इयत्ता पाचवी उत्तीर्ण असावा, राहील. महाराष्ट्रात दोन वर्षांचे वास्तव्य असावे. इयत्ता बारावीच्या समकक्ष शिक्षणासाठी किमान वय १७ वर्षे असावे, अशा अटी असतील. सर्व अभ्यासक्रम हे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ निश्चित करेल. कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम त्यात समाविष्ट असतील. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियामक मंडळ असेल आणि पुणे येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हे या मंडळाचेही अध्यक्ष असतील. तसेच सदस्यांमध्ये शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.