शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

१०० एमएलडीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

शंभर एमएलडी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेला हरित लवादाकडून घेण्यात आलेल्या हरकतीसह शोभाताई फडणवीस आणि वनखात्यानेही हरकत मागे घेतली

शशी करपे,

वसई- वसई विरार शहराला दररोज आणखी शंभर एमएलडी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेला हरित लवादाकडून घेण्यात आलेल्या हरकतीसह शोभाताई फडणवीस आणि वनखात्यानेही हरकत मागे घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच या योजनेच्या कामाला सुरुवात होईल. पावसाने मोठा अडथळा आणला नाही तर वसई विरार शहराला येत्या तीन-चार महिन्यातच वाढीव शंभर एमएलडी पाणी पुरवठा सुरु होणार आहे. वाढती लोकसंख्या पाहून सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा क्रमांक ३ मधून वसई विरार शहराला दररोज शंभर एमएलडी पाणी पुरवठा होणार आहे. त्यासाठी २९६ कोटी रुपयांची योजना हाती घेण्यात आली आहे. पालिकेने एमएमआरडीएकडून स्वत: ही योजना चालवायला घेतली आहे. २७ जानेवारी २१०४ रोजी योजनेच्या प्रशासकीय कामाला मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. २८ फेब्रुवारी १६ ला योजनेचे काम पूर्ण होऊन मार्च महिन्यापासून प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरु होणार होता. मात्र योजनेतील १९ किलोमीटर मार्गातील जलवाहिनी वनविभागातून जात आहेत. त्यातील १ हजार १०१ झाडे तोडण्यास वनविभागाने हरकत घेतली होती. त्यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालिकेकडून महाड येथे पर्यायी जागा दिल्यानंतर वनविभागाने डिसेंबर २०१५ मध्ये परवानगी दिली होती. ही परवानगी मिळाली असतानाच याच मार्गातील १० किलोमीटर क्षेत्र वन्यजीव परिक्षेत्रात मोडत असल्याने या संरक्षित क्षेत्रातील ३७७ झाडे तोडण्यास हरित लवादाने आक्षेप घेतला होता. याविरोधात शोभाताई फडणवीस आणि वनविभागाने हरकत घेतल्याने हरित लवादाने यामार्गातील सर्वच झाडे तोडण्यास नकार दिल्याने योजनेचे काम रखडून पडले होते. लवादाने आक्षेप घेतांना हायकोर्टाच नागपूर खंडपीठाच एका निकालाचा संदर्भ घेत योजनेमुळे संरक्षित वनक्षेत्रातील झाडे कापल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असे म्हटले होते. गेल तीन महिन्यांपासून पुणे येथे हरित लवादापुढे याप्रकरणी सुनावणी सुरु होती. गेल्या आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडली. शोभाताई फडणवीस, मुख्य वन सचिव आणि डहाणूचे उप वनसंरक्षक याचिकाकर्ते होते. शेवटच्या सुनावणीत फडणवीस यांनी योजनेला हरकत नसल्याचे म्हणणे लवादापुढे मांडले. वन विभागाचे मुख्य सचिव यावेळी गैरहजर होते. तरही डहाणूच्या उप वनसंरक्षकांनी योजनेला हरकत नसल्याचे सांगितले. >योजनेच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. काम पूर्ण करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री सज्ज असून लवादाकडून अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर युद्धपातळीवर काम पूर्ण करण्यात येईल. पावसाने अडथळा आणला नाही तर तीन महिन्यात वसई विरार शहराला आणखी दररोज शंभर एमएलडी पाणी मिळणार आहे.- हितेंद्र ठाकूर, आमदारसर्व सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. प्रतिज्ञापत्र सादर करून घेण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येईल. या योजनेत आता कुठलाही अडथळा राहिलेला नाही. - सतीश लोखंडे, आयुक्तपालिकेने वनखात्याच्या सर्व अटी शर्ती पूर्ण केल्या आहेत. झाडे कापण्याचे पैसेही वनखात्याला दिलेले आहेत. तमुळे लवादाकडून परवानगी मिळाल्यानंतर कामाला लगेचच सुरुवात केली जाईल.-बी. एम. माचेवाड, शहर अभिंता (पाणी पुरवठा) तीन ते चार महिन्यांत काम होणार पूर्णयाचिकाकर्ते पंधरा दिवसात प्रतिज्ञापत्र लवादापुढे सादर करणार आहेत. त्यानंतर लवादाकडून अधिकृत परवानगी दिली जाणार आहे. या घडामोडीनंतर वसई विरार शहराला आणखी शंभर एमएलडी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेतील सर्व अडथळे दूर झाले असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. हे काम येत्या तीन-चार महिन्यात पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरु होणार आहे.