शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
3
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
4
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
5
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
6
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
7
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
8
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
9
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
10
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
11
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
12
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
13
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
14
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
15
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
16
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
17
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
18
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
19
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
20
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं

मिहानमध्ये दुसऱ्या धावपट्टीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: December 25, 2014 00:29 IST

मिहानमध्ये अखंड व स्वस्त विजेचा पुरवठा आणि आता दुसरी धावपट्टी निर्मितीचा प्रश्न सुटल्याने मिहानला बुस्ट मिळणार आहे.

सहा वर्षांपासून प्रलंबित निर्णयावर तोडगा : कार्गोला गती मिळणारनागपूर : मिहानमध्ये अखंड व स्वस्त विजेचा पुरवठा आणि आता दुसरी धावपट्टी निर्मितीचा प्रश्न सुटल्याने मिहानला बुस्ट मिळणार आहे. हवाईदलाच्या ताब्यातील २७८ हेक्टर जमीन राज्य सरकारला मिहान प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय बुधवारी नवी दिल्लीत केंद्राच्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे.एअर कार्गोला गती मिळणारकेंद्र सरकारच्या निर्णयामुळे नागपुरातील एअर कार्गोला गती मिळेल. गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित दुसरी धावपट्टी निर्मितीचा प्रश्न स्थानिक राजकीय नेतृत्वामुळे निकाली निघाल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले. राज्य सरकार हवाईदलाला शिवणगावलगत ४०० हेक्टर जमीन देणार आहे. या निर्णयामुळे देशविदेशातील गुंतवणूकदार मिहानमध्ये उद्योग उभे करतील, शिवाय येथील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होतील, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. माहितीनुसार, हवाईदलाच्या ताब्यात असलेली २७८ हेक्टर जमीन पाच तुकड्यात विभागली असल्याने हवाईदलाला गजराज प्रकल्पाचा एकत्रित विकास करणे शक्य नव्हते. गजराज प्रकल्पाच्या विकासासाठी हवाईदलाला धावपट्टी विकास आणि विस्तारीकरणासाठी अखंड जागेची आवश्यकता होती. पण त्याचवेळी हवाईदलाची जमीन मिहान विमानतळाच्या सीमेवर येत असल्याने प्रकल्पाच्या विकासात अडथळा निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)मिहान-गजराज प्रकल्पाला आता गती मिळेल : नितीन गडकरी भारतीय विमान प्राधिकरण आणि भारतीय हवाई दलाच्या जमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी मिळाल्याने मिहानच्या मार्गातील एक मोठा अडसर दूर झाला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता मिहान प्रकल्पाला गती मिळेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे हवाईदलाच्या गजराज तसेच नागपूरच्या विकासाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला मिहान, असे दोन्ही प्रकल्प आता वेगाने पूर्णत्वास जातील, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.