शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबईतील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: June 10, 2017 03:31 IST

मुंबई उपनगरे, ठाणे, नवी मुंबई व सिडकोच्या जागेवरील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला २०१४मध्ये दिलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी उठवली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई उपनगरे, ठाणे, नवी मुंबई व सिडकोच्या जागेवरील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला २०१४मध्ये दिलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी उठवली. त्यामुळे येथे ही योजना राबवण्याचा मार्ग मोकळा झाला असून जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार आहे. या योजनेअंतर्गत झोपडपट्टी व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या खासगी विकासकांनाही चार एफएसआय मिळणार आहे. ‘क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्यासाठी राज्य सरकारने त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होणार आहे, याचा अभ्यास केला आहे. तज्ज्ञांनीही अभ्यास करून त्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या योजनेला सप्टेंबर २०१४मध्ये दिलेली स्थगिती उठवण्यात येत आहे’, असे न्यायालयाने म्हटले. झोपड्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यास पुढाकार घेणाऱ्या खासगी विकासकांना प्रोत्साहन म्हणून चार एफएसआय देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली. याचाच अर्थ खासगी विकासक ६० मजल्यांपर्यंत इमारती बांधू शकतात. मात्र या योजनेला ठाण्याचे रहिवासी दत्तात्रय दौड यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. राज्य सरकारने ही योजना राबवण्यापूर्वी पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा आणि पायाभूत सुविधांवर पडणाऱ्या ताणाचा अभ्यास केला नाही, असा दावा दौड यांनी केला होता. या सर्व बाबींचा अभ्यास करण्यात आला असून, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि सिडको येथे ही योजना राबवली जाऊ शकते, असे तज्ज्ञांनी अहवालात म्हटले आहे, असे मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयाला सांगितले.