शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

दावचवाडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ग्रंथालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 15:04 IST

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात नवीन पिढी मोबाईल , वॉटस्अप, इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटत असताना वाचनालय , ग्रंथालयाच्या पायऱ्या नवीन पिढीला

ऑनलाइन लोकमत निफाड (नाशिक), दि. 2 - आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात नवीन पिढी मोबाईल , वॉटस्अप, इंटरनेटच्या जाळ्यात गुरफटत असताना वाचनालय , ग्रंथालयाच्या पायऱ्या नवीन पिढीला चढायला वेळ नाही. आजची पिढी ही वाचनापासून दूर होत चाललेली असताना बालपणापासूनच वाचनाची गोडी लागावी, थोर व्यक्तिंची चरित्रे वाचून प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांच्या वैचारिक कक्षा रुंदाव्यात या उद्देशाने तालुक्यातील दावचवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत स्वतंत्र ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या ग्रंथालयाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शाळेच्या मुख्याध्यापक सविता वैद्य यांच्या कल्पनेतून या शाळेत इ-लायब्ररी तयार करण्यात आली. विद्यार्थी,शिक्षक आता एका क्लिक वर एलइ डी पडद्यावर विविध पुस्तकांचे वाचन करु शकणार आहेत. तसेच मराठीतील अनेक साहित्य, गोष्टींची पुस्तके, वैज्ञानिक पुस्तके, आत्मचरित्र, मराठी शब्दकोश, गीता, काव्यसंग्रह, विनोदी पुस्तकें, कला, कार्यानुभव विषयक, हस्तपुस्तिका अशा अनेक पुस्तकांचा संग्रह येथे वाचण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे.. विद्यार्थी वाचन विभाग, शिक्षक वाचन विभाग व पालक वाचन विभाग असे विभाग येथे करण्यात आलेले आहे.दैनिक नियोजनात ४५ मिनिटांची तासिका ह्या ग्रंथालयासाठी ठेवण्यात आलेली आहे. दावचवाडी येथील शाळेत ‘इ-लायब्ररी’ तसेंच ‘स्वयंअध्ययन माझी अभ्यासिका’ या स्वतंत्र कक्षाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी योगेश्वर मोरे, दत्तात्रेय कुयटे,योगेश कुयटे,दशरथ शिंदे,आजिम शेख,उमेश पवार, सुनिता गायकवाड उपस्थित होते. बीट विस्तार अधिकारी चव्हाण साहेब, केंद्रप्रमुख भारती लोहिते यांनी या शाळेतील इ-लायब्ररीस भेट देऊन समाधान व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.