शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत मोफत सायकल पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2016 04:01 IST

सायकल टू वर्क ही संकल्पना मुंबईत रुजविण्यासाठी प्रथमच विनामूल्य सायकल पार्किंगची सोय महापालिका करणार आहे. याची सुरुवात ए वॉर्डपासून झाली आहे.

मुंबई : सायकल टू वर्क ही संकल्पना मुंबईत रुजविण्यासाठी प्रथमच विनामूल्य सायकल पार्किंगची सोय महापालिका करणार आहे. याची सुरुवात ए वॉर्डपासून झाली आहे. काळा घोडा, क्रॉफर्ड मार्केट, हुतात्मा चौक आणि इरोस जंक्शन येथे असे सायकल स्टँड तयार करण्यात आले आहेत.मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकीच्या कोंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पर्यावरण, वाहतूक आणि डिझेल वाचविण्यासाठी ‘सायकल टू वर्क’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. हुतात्मा चौक, मंत्रालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, फोर्ट परिसर, चर्चगेट, गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉइंट ही सर्वाधिक वर्दळीची ठिकाणे आहेत़ त्यानुसार पहिल्यांदाच दक्षिण मुंबईतून सायकल पार्किंगचे स्टँड उभारण्यास सुरुवात झाली आहे. पार्किंग सायकलस्वारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे़ काळा घोडा येथे यापूर्वीच सायकल स्टँड बसविण्यात आले आहे. त्यापाठोपाठ शनिवारी चर्चगेट स्थानकाबाहेर इरोस चित्रपटगृहाबाहेर, क्रॉफर्ड मार्केट, हुतात्मा चौक येथील फ्लोरा फाउंटनजवळही सायकल स्टँड बसविण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)या ठिकाणी सायकलची मोफत पार्किंगहुतात्मा चौक, मंत्रालय, छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, फोर्ट परिसर, चर्चगेट, गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉर्इंट, बलार्ड इस्टेट़वाहनतळाची क्षमतासरकारी व खासगी कार्यालयांमुळे अतिवर्दळीचा व उच्चभ्रू ठरलेल्या या विभागामध्ये ४७ वाहनतळ आहेत़ या वाहनतळामध्ये आठ हजार १९७ वाहनांचे पार्किंग शक्य आहे़ या ४७ वाहनतळांवर पाच हजार ६५० चारचाकी आणि दोन हजार ५४७ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय आहे़ ४७० सायकलींना मोफत पार्किंगवाहनतळावर प्रत्येकी १० याप्रमाणे ४७० सायकलींंना मोफत पार्किंग उपलब्ध होणार आहे़