विरार : दिल्ली येथील बचपन बचाव आंदोलनाने केलेल्या तक्रारीवरून कामगार आयुक्त, पालघर गुन्हे अन्वेषण शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने वालीव परिसरातील विविध कंपन्यांमध्ये काम करीत असलेल्या २३ बालकामगारांची मुक्तता केली. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. २३मधील २१ बालकामगार उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील एकाच गावातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील बरीचशी मुले गेल्या दोन वर्षांपासून बालकामगार म्हणून काम करीत होती. मुख्यत्वे ज्वेलरी आणि शिवणकाम असलेल्या कंपन्यांमध्ये ती काम करीत असल्याचे आढळून आले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)
वसईतून २३ बालकामगारांची झाली मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 04:48 IST