शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट ई-मेलद्वारे फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 02:35 IST

व्यवस्थापकीय संचालकाच्या नावे बनावट मेल आयडी बनवून एका अज्ञात आरोपीने कंपनीला साडेचार लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले

महेश चेमटे,

मुंबई- एका दिग्गज कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाच्या नावे बनावट मेल आयडी बनवून एका अज्ञात आरोपीने कंपनीला साडेचार लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. सायबर क्राइमकडे ही तक्रार आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. एका कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याला व्यवस्थापकीय संचालकाच्या मेलवरून ‘तातडीने पैसे ट्रान्सफर करा’, अशा आशयाचा मेल येतो. हा मेल थेट कंपनीच्या संचालकाचा असल्याने मुख्य वित्तीय अधिकारी कोणतीही शहानिशा न करता मेलवरील बँक खात्यावर तातडीने पैसे पाठवतो. पण प्रत्यक्षात ते पैसे अज्ञात इसमाच्या खात्यात जमा झालेले असतात. या घटनेची नोंद बीकेसीमधील साइबर क्राइम पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. सध्या सायबर पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. फसवणूक झालेल्या कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याला त्याच्याच कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या मेल आयडीवरून ‘आरटीजीएस रक्कम किती दिवसात ट्रान्सफर करू शकता? शक्य तितक्या लवकर या खात्यावर पैसे पाठवा’ असा मेल आला. या बनावट मेल आयडीमध्ये केवळ एका इंग्रजी अद्याक्षराचा बदल केल्याचे आढळून आले आहे. पैसे पाठवल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला पैसे पाठविल्याचा फोन केल्यानंतर ‘मी पैसे ट्रान्सफर करण्याचा कोणताही मेल केलेला नव्हता’ असे सांगताच मुख्य वित्तीय अधिकाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीच्या संचालकांनी साइबर क्राइम पोलीस स्थानकात धाव घेतली. अज्ञात आरोपीच्या ई-मेल आयडी, बँक खाते, संगणकाच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून आरोपीचा शोध सुरू आहे.