शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे विभाग नियंत्रक, सीएस, डॉक्टरांसह ३६ जणांवर फसवणुकीचे गुन्हे

By admin | Updated: April 14, 2016 02:18 IST

राज्य परिवहन महामंडळातील रंगअंधत्व प्रकरण भोवले, बड्या अधिका-यांसह डॉक्टरांचा समावेश.

अकोला - राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात कार्यरत असलेल्या चालकांना रंगअंधत्वाचा (कलर ब्लाइंडनेस) आजार दाखवून त्यांना बनावट दस्तावेजाद्वारे सुरक्षा रक्षकपदी नियुक्ती देऊन महामंडळाची कोट्यवधी रूपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी एसटीचे तत्कालीन अकोला विभाग नियंत्रक, औरंगाबादचे कामगार अधिकारी, अकोला व वाशिम येथील जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस), तसेच मानसेवी डॉक्टरांसह ३६ जणांविरुद्ध बुधवारी रात्री खदान पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. या प्रकरणात अनेक बड्या अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील अकोला व वाशिम आगारात कार्यरत असलेल्या २६ चालकांना रंगअंधत्वाचा आजार दाखविण्यासाठी अकोला विभागाचे तत्कालीन विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी (सध्या मुंबई येथे कार्यरत), औरंगाबादचे कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे, सहायक कर्मचारी अधिकारी रमेश एडके, लिपिक प्रभाकर गोपनारायण, मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.व्ही. तारे, सीएस आर.एच. गिरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता काळे, वाशिमच्या सीएस डॉ. सुरेखा मेंढे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही.डी. क्षीरसागर यांनी संगनमताने बनावट दस्तावेज तयार केले. त्यानंतर या २६ चालकांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्यांना राज्य परिवहन महामंडळात सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली.  या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ स्तरावरून परिवहन महामंडळाने 'मुंडीवाले' समिती गठित केली. या समितीने अकोल्यात दाखल होऊन विभागातील नऊ आगारांतील सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असलेल्या २६ चालकांची वैद्यकीय तपासणी केली, तसेच त्यांच्या रंगअंधत्वाच्या प्रमाणपत्रासह सर्व दस्तावेज जप्त केले. वैद्यकीय तपासणीत २६ पैकी एकाही चालकाला रंगअंधत्व नसल्याचे उघड झाले, तर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्राप्त केलेले रंगअंधत्वाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार सुरक्षा व दक्षता अधिकारी डी.वाय. डोंगरे यांनी खदान पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी या बड्या अधिकार्‍यांसह २६ चालकांवर फसवणूक व कट रचल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.