शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक घोटाळ्याचा आरोप करून कामगाराला मारहाण

By admin | Updated: February 16, 2015 03:29 IST

पगार आणि थकबाकीची मागणी करणा-या प्रदीप त्रिवेदी या कामगारावरच १० लाखांच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप करून शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यात आल्याच्या आरोपावरून

ठाणे : पगार आणि थकबाकीची मागणी करणा-या प्रदीप त्रिवेदी या कामगारावरच १० लाखांच्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप करून शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करण्यात आल्याच्या आरोपावरून विनोद आणि दामोदर पटेल आणि त्यांचा मित्र अशा तिघांंविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून एका धनादेशावर जबरदस्तीने सह्णाही घेतल्याची तक्रार त्यांनी केली आहे.११ फेब्रुवारी २०१५ रोजी कंपनीचे मालक आणि त्यांचे मित्र भरतभाई यांनी त्रिवेदी यांना केबिनमध्ये बोलवून घेतले आणि मारहाण करून शस्त्राच्या धाकाने कोऱ्या कागदावर सह्णाही घेऊन १५ एप्रिल २०१५ पर्यंत सर्व रक्कम परत करेन, असे त्यांनी बळजबरीने लिहून घेतल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे़ तसेच त्यांचे सारस्वत बँकेचे चेकबुक दामोदर यांनी जबरदस्तीने काढून त्यावरील एका चेकवर विनोद यांचे नाव टाकून त्यावर काही रकमेचा उल्लेखही केला. नंतर, त्यांना कंपनीच्या इनोव्हा गाडीतून दहिसर येथील घरी आणून सोडले. त्यानंतर, विनोद यांनी त्यांच्या मोबाइलवर फोन करून ‘पोलीस स्टेशनला तक्रार केलीस तर तुला व तुझ्या परिवाराला बरबाद करू’ अशी धमकी दिल्याचा आरोप प्रदीप यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी १४ फेब्रुवारी रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात मारहाण तसेच धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिशुपाल हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)