शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांची बँकेवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:33 IST

जिंतूर तालुक्याच्या बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीक विमा स्वीकारला जात नसल्याच्या निषेधार्थ शेतकºयांनी गुरुवारी परभणी-जिंतूर महामार्गावर रास्तारोको केला.

बोरी (जि. परभणी) : जिंतूर तालुक्याच्या बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत पीक विमा स्वीकारला जात नसल्याच्या निषेधार्थ शेतकºयांनी गुरुवारी परभणी-जिंतूर महामार्गावर रास्तारोको केला. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकºयांनी बँकेवर दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी शेतकºयांवर सौम्य लाठीमार केला.बोरी येथे महा-ई-सेवा केंद्रावरील वेबसाइट ठप्प झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पीक विमा भरण्यासाठी शेतकºयांनी सकाळपासून गर्दी केली होती. मात्र राष्टÑीयीकृत बँकेचा बोजा असलेल्या शेतकºयांनी आमच्या शाखेत पीक विमा भरू नये, असे शाखाधिकारी आर.व्ही. सरोदे यांनी सांगितले. बचत खाते ज्या बँकेत आहे, त्याच बँकेत शेतकºयांनी पीक विमा भरावा, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकºयांनी तेथे गोंधळ घालून बँकेचे कामकाज बंद पाडले.त्यानंतर परभणी-जिंतूर महामार्गावर त्यांनी रास्ता रोको केले. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाखाधिकाºयांना भेटून पीक विमा भरण्याचे काम सुरू करा, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर बँकेचे शटर उघडत असताना काही जणांनी बँकेवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार सुरू केला. त्यानंतर आंदोलक पळून गेले.