शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चौथी आत्महत्या

By admin | Updated: June 9, 2017 00:54 IST

बारामती तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. सलग चौथ्या आत्महत्येने बारामती तालुका पुन्हा एकदा हादरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसुपे : बारामती तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. सलग चौथ्या आत्महत्येने बारामती तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. भोंडवेवाडी येथील हनुमंत पांडुरंग शिंदे (वय ४८) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. ८) सकाळी उघडकीस आली. महिन्यापासून तालुक्यातील ही चौथी घटना आहे. पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, कर्जबाजारीपणामुळे शिंदे यांनी आत्महत्या केली असल्याची खबर त्याचा भाऊ सुनील शिंदे यांनी पोलिसांना दिली. शेतात दोन वर्षांपासून काही पिकत नव्हते. त्यामुळे भोंडवेवाडी सोसायटीचे तसेच छत्रपती शिवाजी राजे पुरुष गटाचे कर्ज झाले होते. पुरुष गटाचे कर्ज वेळेवर भरता आले नसल्याने थकले होते. दुसऱ्या मुलीच्या लग्नाची बोलणी झालेली होती. तर आईचे सतत असणारे आजारपण, मागील दोन महिन्यांपूर्वी सोसायटीच्या पीक कर्जातून आणलेली बैलजोडी सर्पदंशाने मृत पावली. या सर्व घटनांतून आलेल्या नैराश्यातून हनुमंत यांनी दुसऱ्याच्या शेतात जाऊन मध्यरात्रीला विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती त्यांचा भाऊ सुनीलने पोलिसांना दिली. यासंदर्भातील अधिक तपास येथील पोलीस उपनिरिक्षक ए. एस. जाधव करीत आहेत. बारामती तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याने आत्महत्या करण्याची गेल्या एक महिन्यातील ही चौथी घटना आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. एका मुलीचे लग्न झालेले असून दुसऱ्या मुलीचे होणार होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समिती सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, पंचायत समिती सदस्या नीता बारवकर, अप्पा शेळके, शौकत कोतवाल, गणेश चांदगुडे, पोपटराव पानसरे, संपतराव काटे आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान या घटनेची माहिती कळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी सुपे ग्रामीण रुग्णालयात येऊन कुटुंबाची भेट घेतली. या वेळी त्यांच्या एका मुलाची व मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी सुळे यांनी घेतली. तसेच या सरकारने लवकच शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतीमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी केली.