शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चौघा सराईत दरोडेखोरांना अटक

By admin | Updated: September 20, 2016 02:58 IST

मध्यप्रदेशात शस्त्राच्या धाकाने व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या मुंबईतील चौघा सराईत दरोडेखोरांना गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली

मुंबई : मध्यप्रदेशात शस्त्राच्या धाकाने व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या मुंबईतील चौघा सराईत दरोडेखोरांना गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख सव्वा लाख रुपये, चार पिस्तुल अन्य साहित्य जप्त केले. इलियास उर्फ बचकाना उर्फ समीर अजीज खान (वय ३६), शफीक खान, रमीझ उर्फ बंकू झाकीर शेख (२६), वसीम सत्तार खान (२५) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर उज्जैन, देवास शहरातील विविध पोलीस ठाण्यात २५ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. उज्जैन, देवास याठिकाणी गेल्या तीन वर्षात भरदिवसा व्यापाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून, काहीवेळा गोळीबार करुन लुटण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्याबाबत तेथील गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्हेगार हे मुंबईतील असून गुन्हा करून पुन्हा मुंबईला जात असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याबाबत मध्य प्रदेश पोलिसांकडून आलेल्या माहितीनुसार गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-३च्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. चौघाच्याकडून रोख रक्कम व गुन्ह्यासाठी वापरले पिस्तुल, तीन कार, दोन मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांना मध्य प्रदेश पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आल्याचे वरिष्ट निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)