शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गमध्ये ‘स्वाइन’चा चौथा रुग्ण

By admin | Updated: May 10, 2017 23:03 IST

आरोग्य यंत्रणेत खळबळ; माकडतापापाठोपाठ स्वाइनचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कदोडामार्ग : माकडतापापाठोपाठ स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. तालुक्यात स्वाइन फ्लू बाधित चौथा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. गितांजली गोविंद सावंत (वय ५७, रा. झरेबांबर) असे रुग्णाचे नाव असून, त्यांच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली. गेल्या वर्षभरात माकडतापाने दोडामार्ग आणि बांदा परिसरात थैमान घातले आहे. माकडतापाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच काहीजणांचे बळीही गेले. त्यामुळे दोडामार्ग व बांदा परिसरातील लोक माकडतापाच्या दहशतीखाली आहेत. असे असताना महिनाभरापूर्वी तालुक्यात सोनावल येथे रंजना अशोक चोर्लेकर (४२), घोडगेवाडी येथे प्रथमेश प्रभाकर सातार्डेकर (१०) व साटेली-भेडशी येथील विराज गवस असे तीन रुग्ण आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून स्वाईन फ्लूवरील औषधे उपलब्ध असल्याने ताप आल्यास सरकारी दवाखान्यात येऊन तपासून घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले होते. अशातच झरेबांबर येथील गितांजली गोविंद सावंत यांना ताप येत असल्याने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार करून त्यांची तब्येत सुधारल्यावर रुग्णालयातून घरी पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली. महिन्याभरात चार रुग्णस्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, गेल्या महिन्याभरात चार रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, नागरिकांनी ताप आला म्हणून घाबरून न जाता सरकारी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य यंत्रणेच्यावतीने डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले आहे.