शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

फसवणुकीला आळा घालण्यासाठी ‘फोर्थ फोर्स’

By admin | Updated: December 3, 2015 01:21 IST

वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी माजी पोलीस अधिकाऱ्यांनी फोर्थ फोर्सची स्थापना केली आहे. लोअर परेल येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात सीबीआयचे माजी विशेष संचालक

मुंबई : वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी माजी पोलीस अधिकाऱ्यांनी फोर्थ फोर्सची स्थापना केली आहे. लोअर परेल येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात सीबीआयचे माजी विशेष संचालक आणि फोर्थ फोर्सचे अध्यक्ष व संचालक डॉ. सलीम अली यांनी या संबधीची घोषणा केली. ते म्हणाले, ‘सीबीआय, रॉ, आरपीएफ आणि पोलीस या क्षेत्रांत काम करणाऱ्या १०० अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला असून, ही संस्था गुन्हेगारी प्रवृत्तींवर नजर ठेवेल.’ मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद, संस्थेच्या पश्चिम विभागाचे मुुख्य अधिकारी ई. नारायणन यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा पुरवणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. संभाव्य गुन्हेगारीला आळा घालण्याच्या हेतूने संस्था आॅनलाइन पद्धतीने काम करणार आहे. शिवाय हेल्पलाइनही संस्थेकडून पुरविण्यात आली आहे. कर्मचारी नेमताना उपयोगी- बीएफएसआय, टेलीकॉम, कॉर्पोरेट आणि रीटेल या क्षेत्राबरोबर घरगुती सेवा पुरवणाऱ्या नोकरदार वर्गाची संख्या मोठी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासूनच त्यांना कामावर ठेवल्यास, धोका टाळता येईल. - एखाद्या व्यक्तीने सादर केलेली माहिती आणि स्वत:ची ओळख खरी आहे की खोटी? हे तपासण्यासाठी ही संस्था योग्य काम करेल, असे अहमद जावेद यांनी यावेळी सांगितले.