शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

युरो सहाचे निकष चार वर्षांआधीच

By admin | Updated: January 8, 2016 03:40 IST

वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण ही सर्वात गंभीर बाब असून ती रोखण्यासाठी वाहननिर्मितीसाठीचे युरो सहाचे निकष चार वर्षे आधीच लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे

मुंबई : वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण ही सर्वात गंभीर बाब असून ती रोखण्यासाठी वाहननिर्मितीसाठीचे युरो सहाचे निकष चार वर्षे आधीच लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. युरो सहाचे निकष २०२४ पासून लागू होतील, असा धोरणात्मक निर्णय आधीच्या यूपीए सरकारने घेतला होता. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत हे निकष २०२० पासून म्हणजे चार वर्षे आधीच लागू करण्याचे निश्चित झाले. जावडेकर यांनी सांगितले की, प्रदूषणाची वाढती समस्या लक्षात घेऊन वाहनांच्या निर्मितीसाठी युरो पाच हे प्रदूषण विरोधी निकष लागू करण्याचा टप्पा वगळून थेट युरो सहाचे निकष इशान्येकडील राज्ये सोडून लागू केले जातील. सध्या युरो चारचे निकष आहेत. त्यामुळे २०२० पासूनच वाहन उत्पादकांना स्कूटरपासून कंटेनरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची निर्मिती करताना युरो सहाच्या निकषांची पूर्तता करावी लागेल. या निकषांची पूर्तता करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचा दर्जा सुधारण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयत तेल शुद्धिकरण कंपन्यांमध्ये ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. युरो सहामुळे वाहनांपासूनचे प्रदूषण नव्वद टक्क्यांनी कमी होऊन स्वच्छ व प्रदूषणमुक्त शहरांसाठी त्याचा फायदा होईल. सध्याच्या वाहनांना दोन प्रकारची छोटी यंत्रे बसविले तरीही प्रदूषण नियंत्रित होईल. युरो सहाचे निकष सध्याची अस्तित्वातील वाहने कशी पूर्ण करतील या बाबतही उपाययोजना करण्यात येणार आहेत. इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीवर ३० टक्के सवलत देण्याचा निर्णय केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने घेतला आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.