शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षे सेनेची, एक वर्ष भाजपाचे

By admin | Updated: November 8, 2015 03:23 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौरपद चार वर्षे शिवसेनेला तर एक वर्ष भाजपाला देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौरपद चार वर्षे शिवसेनेला तर एक वर्ष भाजपाला देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपाच्या मुंबई कार्यालयात ही घोषणा केली. उपमहापौरपद हे चार वर्षे भाजपाला तर एक वर्ष शिवसेनेला देण्यात येणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद आधी दोन वर्षे भाजपाला व नंतरची दोन वर्षे शिवसेनेला दिले जाईल. शेवटच्या वर्षात ते कोणाकडे ठेवायचे, हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे ठरवतील. दानवे आणि देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी कल्याण-डोंबिवलतील सत्तेसाठी बोलणी केली होती. त्यानंतर वित्तमंत्री आणि भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे नेते व सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी बसून फॉर्म्युला निश्चित करावा, असे ठरविण्यात आले. त्यानुसार मुनगंटीवार आणि शिंदे यांच्यात आज चर्चा होऊन फॉर्म्युला ठरला. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांशीही दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली आणि सायंकाळी फॉर्म्युला जाहीर झाला. (विशेष प्रतिनिधी)पहिल्यांदा महापौरपद सेनेकडे जाणारसुरुवातीची अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेकडे राहील. नंतर एक वर्ष भाजपाचा महापौर राहील आणि शेवटच्या दीड वर्षात महापौरपद पुन्हा सेनेला दिले जाईल. उपमहापौरपद सुरुवातीला अडीच वर्षे भाजपाकडे असेल. नंतर एक वर्ष ते शिवसेनेकडे जाईल आणि शेवटच्या दीड वर्षात ते पुन्हा भाजपाकडे जाईल. सूत्रांनी सांगितले की, भाजपाने आधी अडीच वर्षे महापौरपद मिळावे यासाठी आग्रह धरला होता, पण शिवसेनेने त्यास तीव्र विरोध दर्शविला. युती तुटली तरी चालेल पण आम्ही अडीच वर्षे तुम्हाला महापौरपद देऊ शकत नाही, असे सेनेकडून बजावण्यात आले. आमच्यापेक्षा कमी संख्याबळ असूनही तुम्ही अडीच वर्षे महापौरपद मागता तर त्याच न्यायाने राज्याचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला काही काळ द्या, असे शिवसेनेकडून सुनावण्यात आले.११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शनिवारी शिवसेना व भाजपाने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर मनसेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. -वृत्त/२