शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबसमधून पडून चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

By admin | Updated: February 9, 2017 23:21 IST

वाहनातून खाली पडल्याने चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील यशवंत लॉन्समोर घडली़

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 9 - शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनातून खाली पडल्याने चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील यशवंत लॉन्समोर घडली़ मुकुंद प्रवीण कोल्हे (स्वामी समर्थ नगर, यशवंत लॉन्ससमोर, नांदूर नाका) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी परिसरातील लिटील हर्टस् इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुकुंद कोल्हे हा ज्युनियर केजीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पालकांनी शाळेत ने-आण करण्यासाठी मॅक्सिमो (एमएच १५, ईएफ ०५०२) वाहन लावलेले होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर वाहनचालक रज्जाक शेख हा मुलांना घरी सोडवत होता़ सर्व मुलांना घरी सोडल्यानंतर शेवटचा विद्यार्थी हा मुकुंद कोल्हे होता. वाहनचालक शेख याने उर्वरित मुलांना घरी सोडल्यानंतर केवळ मुंकुदला घरी सोडणे बाकी होते़ त्यातच घर अवघ्या पाचशे मीटर असल्याने मुंकुंद दरवाजात जाऊन उभा राहिला होता. त्यावेळी अचानक वाहनाचा दरवाजा उघडला गेला व चालू वाहनातून मुकुंद रस्त्यावरील खडीवर पडला. यामध्ये त्यास जबर मार लागल्याने प्रथम अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला़ या अपघात प्रकरणी आडगाव पोलिसांनी वाहनचालक रज्जाक शेख विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.