शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी चार हजारांचे मनुष्यबळ महापालिका : ७३८ एकूण मतदान केंद्र

By admin | Updated: February 16, 2017 13:13 IST

निवडणुकीसाठी चार हजारांचे मनुष्यबळ

निवडणुकीसाठी चार हजारांचे मनुष्यबळमहापालिका : ७३८ एकूण मतदान केंद्र अमरावती : येत्या महापालिका निवडणुकीसाठी तब्बल ४ हजारांहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा लागणार आहे. भाजपच्या रीता पडोळे या अविरोध निवडून आल्याने ८६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ६२८ उमेदवार उतरले आहेत. प्रत्यक्ष मतदानासाठी पालिका यंत्रणेने पूर्वतयारीला गती दिली आहे.महापालिका क्षेत्रातील २२ प्रभागांसाठी ७३८ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या मतदान केंद्रांवर प्रत्येकी १ केंद्राध्यक्ष आणि प्रत्येकी ३ असे एकूण २९४० कर्मचारी राहणार आहेत. याशिवाय मतदान केद्रांवर उपलब्धतेप्रमाणे शिपाई पुरविण्यात येईल. १० टक्के मनुष्यबळ राखीव ठेवण्यात आले आहे. याशिवाय निवडणूक काळातील विविध पथके आणि तांत्रिक मनुष्यबळ पाहता हा आकडा ४ हजारांवर पोहोचला आहे. सातही झोनमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी असा भला मोठा लवाजमा निवडणूक प्रक्रिया यशस्वीतेसाठी राबत आहेत.मानधन थेट बँक खात्यात ४निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आदींसह अन्य जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवडणूक मानधन यंदा त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. कॅशलेस व्यवहाराकडे एक पाऊल म्हणून हा व्यवहार आरटीजीएसद्वारे करण्यात येणार आहे.या मानधनासाठी संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅक खातेपुस्तिकेचे सत्यप्रत आणि आयएफएससी कोड संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे द्यावा,असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.