शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

गोळीबाराच्या तपासासाठी चार पथके

By admin | Updated: April 13, 2015 05:29 IST

कामावरून घरी परतत असताना दोन हल्लेखोरांनी प्रमोद कामटेकर (४०) या तरुणावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी शिवडी परिसरात घडली

मुंबई : कामावरून घरी परतत असताना दोन हल्लेखोरांनी प्रमोद कामटेकर (४०) या तरुणावर गोळीबार केल्याची घटना शनिवारी शिवडी परिसरात घडली. यामध्ये या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून आर.ए.के. मार्ग पोलिसांनी या हल्लेखोरांच्या शोधासाठी चार पथके तयार केली आहेत. शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना महाजनी पथ परिसरात घडली. याच परिसरात स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय करणारा कामटेकर हा त्याच्या अ‍ॅक्टिव्हावरून घराच्या दिशेने जात होता. याच वेळी दुचाकीवरून दोन अज्ञात इसम आले. त्यांनी कामटेकर याला रस्त्यामध्येच रोखून त्याच्यावर फायरिंग सुरू केली. यामध्ये दोन गोळ्या छातीमध्ये तर दोन गोळ्या पोटामध्ये लागल्या. त्यानंतर मारेकरी फरार झाले. येथील रहिवाशांनी या फायरिंगबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत जखमी कामटेकरला केईएम रुग्णालयात दाखल केले. रात्रीच कामटेकरवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत आर.ए.के. मार्ग पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.