अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी रणजितसिंह चुंगडे सर्वोपचार रुग्णालयातून रात्रभर बेपत्ता झाल्याचे प्रकरण पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील एएसआय ज्ञानेश्वर बोरकर, इरफान खान, दीपक मुदीराज, विजय कबडे चौघांना निलंबित करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत.या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी चुंगडेकडून पैशाची देवाण-घेवाण करून त्याला रात्रभर गायब केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर राउंडवर आले असता, हे प्रकरण उघडकीस आले होते. चौघेही चौकशीत दोषी आढळल्याने त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
चार पोलीस निलंबित
By admin | Updated: March 1, 2017 05:18 IST