शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चारही स्तंभ मजबूत झाल्यावर लोकशाही समृद्ध

By admin | Updated: April 21, 2017 23:59 IST

लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत; तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. सरकार म्हणून पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करणे हे आमचे कर्तव्य होते.

पुणे : लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत; तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. सरकार म्हणून पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करणे हे आमचे कर्तव्य होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद यांच्यानंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला, असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी फडणवीस बोलत होते. पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, आॅल जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस गोविंद घोळवे, जिल्हाध्यक्ष किरण जोशी, वसंत मुंडे, मंदार फणसे आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘‘कर्जमाफी हा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मार्ग असू शकतो. मात्र, कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला तर आपण करंटे ठरू. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देणे, शेतीमालाला योग्य भाव देणे, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आदी गोष्टी करण्याची आवश्यकता आहे.’’बापट म्हणाले, ‘‘पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. पत्रकार समर्पक भावनेतून काम करतात. त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर करण्यात आला.’’सत्काराला उत्तर देताना श्री श्री रविशंकर यांनी पत्रकार, उद्योजक, धर्मगुरू आणि राजकीय नेते यांनी एकत्रिपणे काम केले तर समाजाचा विकास गतीने होईल, असे सांगितले. शेतकऱ्यांमधील निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’च्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाहीदेखील दिली.रायकर म्हणाले, ‘‘पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून मागणी केली जात होती. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यास पाठिंबा दिला. सत्तेत आल्यानंतर त्यांनी कायदा मंजूर केला. तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचे अभिनंदन.’’वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य मराठी संघाला शासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी प्रास्ताविकात संजय भोकरे यांनी केली. राजा माने यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)