शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत व्हावेत

By admin | Updated: April 20, 2017 07:01 IST

लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत; तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. सरकार म्हणून पत्रकार हल्ल्याविरोधी कायदा मंजूर करणे

पुणे : लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत; तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. सरकार म्हणून पत्रकार हल्ल्याविरोधी कायदा मंजूर करणे हे आमचे कर्तव्य होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. स्वामी विवेकानंद यांच्यानंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला, असे गौरवोद्गारही फडणवीस यांनी काढले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार झाला. या वेळी फडणवीस बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, आॅल जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस गोविंद घोळवे, जिल्हाध्यक्ष किरण जोशी, वसंत मुंडे, मंदार फणसे आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘‘जलयुक्त शिवारासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात मिळाला. त्यात आर्ट आॅफ लिव्हिंगने सर्वाधिक काम केले आहे.’’ पत्रकारांच्या सुरक्षतेसाठी हल्ला विरोधी कायदा मंजूर केल्याचे बापट यांनी सांगितले. रायकर म्हणाले, ‘‘विरोधी पक्षात असताना फडणवीस यांनी पत्रकार संरक्षणास पाठिंबा दिला. सत्तेत आल्यानंतर कायदा मंजूर केला. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन.’’ वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय भोकरे यांनी प्रास्ताविक केले. राजा माने यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)