शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या तीन अभियंत्यांसह चार जण निलंबित

By admin | Updated: July 4, 2015 00:32 IST

वीज जोडणीसाठी शेतकरी दाम्पत्याने केला होता आत्महत्येचा प्रयत्न.

अकोला : विद्युत जोडणी न मिळाल्याने बाळापूर तालुक्यातील सागद येथील शेतकरी दिलीप तायडे आणि त्यांची पत्नी राधा यांनी बुधवारी विषारी औषध प्राशन केले होते. या प्रकरणात वीज जोडणीसाठी तायडे यांच्याकडून लाच घेणार्‍या महावितरणच्या दोन अभियंत्यांसह एका तंत्रज्ञास शुक्रवारी निलंबित करण्यात आले. दरम्यान, औद्योगिक वीज जोडणी देण्यासाठी विलंब करणार्‍या आणखी एका अभियंत्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शेतकरी विनोद खारोडे यांनी वीज जोडणी मिळत नसल्यामुळे मे महिन्यात आत्महत्या केली. त्यानंतर बाळापूर तालुक्यातील सागद येथील शेतकरी दिलीप तायडे व राधा तायडे या दाम्पत्याने १ जुलै रोजी विषारी औषध प्राशन केले होते. दिलीप तायडे यांना प्रलंबित विद्युत जोडणीसाठी अभियंता, कंत्राटदार व दलालांकडून पैशाची मागणी करण्यात आली. त्यामुळे पैसे कोठून आणावेत, या विवंचनेत दिलीप तायडे होते. अखेर दोन वर्षांपूर्वी त्यांनी पत्नीचे मंगळसूत्र विकून तत्कालीन अभियंता गणगणे यांना १५ हजार रुपये दिल्याचा आरोप दिलीप तायडे यांचे बंधू पुरुषोत्तम तायडे यांनी केला. या प्रकरणी महावितरणने बाळापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पांडुरंग सांगोळे, कारंजा रमजानपूर शाखेचे तत्कालीन सहायक अभियंता आशिष गणगणे आणि याच शाखेचे तंत्रज्ञ चंद्रकांत इंगळे यांना शुक्रवारी निलंबित केले. औद्योगिक कंपनीच्या वीजपुरवठय़ाला विलंब, अधिकारी निलंबित आकोट येथील औद्योगिक कंपनीचा वीज जोडणीचा अर्ज महावितरणकडे सादर करण्यात आला होता; मात्र या कंपनीला वीज जोडणी देण्यास विलंब करण्यात आला. त्यामुळे अकोला मंडळ कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता प्रभाकर दहापुते यांनाही निलंबित करण्यात आले आहे. लाचखोरांविरुद्ध महावितरणची पोलिसांकडे तक्रार महावितरणने बाळापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता पांडुरंग सांगोळे, कारंजा रमजानपूर शाखेचे तत्कालीन सहायक अभियंता आशिष गणगणे आणि याच शाखेचे तंत्रज्ञ चंद्रकांत इंगळे यांना निलंबित करून, त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे. या तिघांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याचे महावितरणने या तक्रारीत म्हटले आहे.