शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये 2 मुलांसहीत 4 जणांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2017 14:47 IST

नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलांसहीत एकूण चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 - नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलांसहीत एकूण चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.  पहिल्या घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकहून स्थानिक इंजिनिअरिंग कॉलेजचे काही विद्यार्थी रविवारी (26 जून) संध्याकाळी त्र्यंबक घोटी रस्त्यावरील पहिणे वाडी गावात सहलीसाठी आले होते. यातील दोन विद्यार्थ्यांचा तलावात पोहोताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संग्राम सिरसाठ (वय 23) आणि कौस्तुभ भिंगारदिवे (वय 26) अशी मृतांची नावं आहेत. यातील संग्राम हा गंगापूर रोड येथील निवासी होता तर कौस्तुभ अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होती. 
 
पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम आणि कौस्तुभ  तलावात पोहोण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघंही बुडू लागले. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.  सहलीसाठी साधारणतः 5 ते 6 विद्यार्थी आले होते. पहिणे फाटा त्रिफुलीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असेलल्या वळणात वाहने उभी करुन नदीपात्रात असलेल्या डोहाच्या शेजारी बसून सर्वजण पार्टी करत होते. त्यानंतर दोघं जण पोहोण्यासाठी डोहात उतरले असता, त्यातील एक जण बुडायला लागला. दुस-या वाचवण्याच्या प्रयत्नात तो देखील बुडू लागला.
 
आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवासी धावून आले. खडकवाडी येथील तरुणांनी या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करुन त्यांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आल्यानंतर पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले व यानंतर नातेवाईकांना त्यांचे मृतदेह सोपवण्यात आले.  
 
तर दुस-या दुर्घटनेत, नाशिकमधील मुखेड शिवारात राहणारे चंदू दाहिले (वय 14) आणि कार्तिक दाहिले (वय 12) हे सख्खे भाऊ आपल्या आईसोबत प्रवास करत असताना पिंपळगाव परिसरात आल्यानंतर दोघांचा तोल जाऊन तलावात पडले, ज्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला.