शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

By admin | Updated: December 25, 2016 18:42 IST

वेगाशी स्पर्धा करीत नागपूरकडे येणारी कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या ट्रकवर आदळली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 25 - वेगाशी स्पर्धा करीत नागपूरकडे येणारी कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणाऱ्या ट्रकवर आदळली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी आहे. नागपूर - वर्धा - चंद्रपूर महामार्गावरील जामठा शिवारात रविवारी दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यामुळे काही वेळ मार्गावरची वाहतूक प्रभावित झाली होती. एमएच-४० / एफ-०९५२ क्रमांकाच्या कारमध्ये बसून पाच जण वर्धेहून नागपूरकडे येत होते. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. नागपूरनजीकच्या जामठा शिवारात पोहोचताच कारचालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित कार दुभाजकावरून उसळून विरुद्ध मार्गाने येणा-या आयशर ट्रकवर (एमएच-४९/९१९२)  आदळली. त्यानंतर तेवढ्याच वेगात ही कार परत वर्धा मार्गावर येऊन पडली. कारचा वेग आणि  धडक एवढी जोरदार होती की आयशर ट्रकही उलटला अन् कारचे इंजिन तुटून १५ ते २० फूट दूर वेगळे होऊन पडले. कारमधील पाच पैकी चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ट्रकचालक राकेश शंभरकर यालाही या अपघातात जबर दुखापत झाल्याचे कळते. या अपघातामुळे नागपूर - वर्धा - चंद्रपूर मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. माहिती कळताच बुटीबोरी, हिंगणा आणि सोनेगाव तसेच गस्तीवरील पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. कारमधील चौघांचा मृत्यू झाल्याने आणि एक गंभीर जखमी असल्यामुळे मृतांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी कारच्या नंबरवरून प्रयत्न सुरू केले.