शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

पुरवठा अधिकाऱ्यासह चौघांना अटक

By admin | Updated: June 9, 2017 04:39 IST

पुरवठा निरीक्षण अधिकारी वासुदेव बिसन पवार यांच्यासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहाथ अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : रेशनकार्ड काढण्याकरिता १२ हजार रुपयांची लाच मागणारे पुरवठा निरीक्षण अधिकारी वासुदेव बिसन पवार यांच्यासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहाथ अटक केली. आॅनलाइन रेशनकार्ड काढण्यामुळे त्यामधील भ्रष्टाचाराला आळा बसेल, ही अपेक्षा फोल ठरली आहे.तहसील कार्यालयाच्या आवारातील ग्रामीण पुरवठा कार्यालयातील तिघा अधिकाऱ्यांसह एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ई-महासेवा केंद्रामार्फत विविध शासकीय कागदपत्रे पुरवण्यात येतात. तक्रारदाराने त्यापैकी एका केंद्राद्वारे रेशनकार्ड काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज केला व कागदपत्रे सादर केली होती. मात्र, नवीन रेशनकार्ड देण्याकरिता पुरवठा निरीक्षण अधिकारी वासुदेव बिसन पवार यांनी ५५०० रुपये, पुरवठा अव्वल कारकून संजय बाळाराम जाधव यांनी ४ हजार रुपये व संभाजी सिंधू चव्हाण यांनी १५०० रुपयांची मागणी केली होती. खासगी सहायक उदय पाटील यांनीही पैशांची मागणी केली होती. ई-महासेवा केंद्रचालकाने लाचलुचपत कार्यालयाकडे या तिघांबाबत तक्रार केली. गेली दोन दिवस या तिघांवर नजर ठेवल्यावर गुरुवारी सापळा रचून त्यांना ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी अटक केली. आॅनलाइन अर्ज करणाऱ्यांना रेशनकार्ड मिळवून देण्याकरिता दलालाचे काम करणाऱ्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, नंतर सोडून दिल्याचे समजते.