शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कुरकुंभ स्फोटप्रकरणी चार अधिकाऱ्यांना अटक

By admin | Updated: September 21, 2016 01:31 IST

कुरकुंभ (ता. दौंड) येथील ईटरनीस कंपनीत झालेल्या स्फोटात दोन ठार, तर दोन जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी झाली.

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील ईटरनीस कंपनीत झालेल्या स्फोटात दोन ठार, तर दोन जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी झाली. याप्रकरणी कंपनीतील ४ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.श्रीराम सावळापूरकर (वय ४२), विजय खाडे (वय ४७, दोघे रा. विमाननगर पुणे), विकास बर्गे (वय ३६, रा. जनता कॉलनी, दौंड) व देवेंद्रसिंह धामी (वय ३६, रा. खोपोली) या चौघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती ठाणेअंमलदार गोपाळ ओमासे यांनी दिली.कुरकुंभच्या औद्योगिक क्षेत्रामधील सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. औद्योगिक क्षेत्रामधील ईटरनीस या कंपनीमध्ये हायड्रोजनच्या रासायनिक अभिक्रियेदरम्यान झालेल्या भीषण स्फोटामुळे या विषयाला चालना मिळत आहे. ईटरनीस ही सुगंधी द्रव बनवण्याचा कच्चा माल उत्पादन करणारी कंपनी आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन वायूचा वापर केला जातो. परिणामी, हायड्रोजनचा साठा या ठिकाणी केला जातो. त्यामुळे या घटनेतून जर धडा घेतला नाही, तर एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे उपाययोजना हे एकमेव सूत्र सर्व कंपनीच्या व्यवस्थापनाला पाळावेच लागेल.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र हे रासायनिक उत्पादन करणारे एक महत्त्वाचे आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या उद्योगांचे क्षेत्र मानले जाते. देशभरातून मोठ्या संख्येने कामगार या ठिकाणी येत असून अगदी जलद गतीने परिसरातील विकासात वाढ झालेली आहे.या औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक कंपनीमधील सुरक्षाव्यवस्था अत्यंत दयनीय परिस्थिती आहे. त्यामुळे वारंवार होणारे अपघात व त्यामध्ये जाणारे कामगारांचे जीव याबाबत सहसा कुणीच बोलताना दिसत नाही. अपघातानंतर कंपनी निरीक्षक, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यंत्रणा जागृत होतात. मात्र, यामधून आजपर्यंत काहीच साध्य झाले नसल्याचे दिसते. त्यामुळे परिणामी या औद्योगिक कंपनीमध्ये काम करणारे कामगार व परिसरातील गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. हा स्फोट झाल्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याचे सलग्न अधिकारीवर्गाने टाळले आहे. त्यामुळे झालेल्या प्रकारावर काय निर्णय घेतला जाणार? हा येथील सामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न कायम राहणार आहे.(वार्ताहर)>सुरक्षा यंत्रणेचा कमीपणा हायड्रोजनसारख्या वायूचा स्फोट होणे ही गंभीर बाब आहे. मात्र, तरीही या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना अथवा सुरक्षा साधनांचा अभाव दिसतो. मोठ्या उद्योगसमूहाकडे देखील अग्निशामक वाहन गरजेचे आहे. मात्र, ते हातावर मोजण्याइतक्याच कारखान्यांनी व्यवस्था केल्याचे दिसते. रात्री घडलेल्या अपघाताला मदतकार्य सुरू करण्यासाठी वाट पाहणे हा सुरक्षा यंत्रणेचा कमीपणा दिसतो.>अधिकाऱ्यांचे दुर्लक्षकुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील जवळपास सर्वच कंपन्यांचे उच्च पदस्थ अधिकारी वर्ग पुण्याला वास्तव करीत असल्यामुळे रात्रीअपरात्री झालेल्या अपघातावर अथवा एखाद्या घटनेबाबत निर्णय घेण्यास व साधने उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होतात. तर, रात्र पाळीतील सुरक्षा यत्रंणा या येथील सुरक्षारक्षक व अगदीच याबाबत साधारण माहिती असणाऱ्यांच्या भरवशावर असल्याचे वास्तव पाहावयास मिळते.