शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

चार महिन्यांची वारी!

By admin | Updated: January 30, 2015 03:53 IST

‘पंढरीची वारी’ हा विषय धार्मिक असल्याचा समज होता़ त्यामुळे संकल्पना निवड समितीने त्यातील अनेक बारकावे तपासले

नवी दिल्ली : ‘पंढरीची वारी’ हा विषय धार्मिक असल्याचा समज होता़ त्यामुळे संकल्पना निवड समितीने त्यातील अनेक बारकावे तपासले आणि शेवटी तिथे नवस बोलला जात नाही, पशुहत्या केली जात नाही, शारीरिक पीडा देणारे कोणतेही विधी नसतात. वारकरी हा पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊनही आनंदी होतो असा हा निरागस दृष्टिकोन असलेला भलामोठा सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राला लाभला आहे, असे ध्यानात येताच या चित्ररथाला मान्यता दिली. चार महिन्यांपूर्वी ही संकल्पना संरक्षण विभागाने मान्य केली. तत्कालीन सांस्कृतिक कार्य संचालक संजय पाटील, सहसंचालक मनोज सानप, कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे, नृत्यदिग्दर्शक संतोष भांगरे यांनी संरक्षण विभागाच्या चित्ररथ निवड समितीने ही संकल्पना मंजूर करावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या चित्ररथाची बांधणी व कलावंतांची रंगीत तालीम संरक्षण विभागाच्या रंगशाळेत सुरू होती़ त्या वेळी व अगदी २३ तारखेच्या रंगीत पथसंचलनाच्या वेळी नवे संचालक अजय अंबेकर यांनी अनेक बारकाव्यांवर काम केले. गैरसमज व समज या परीक्षेतून गेलेला हा चित्ररथ आज पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. ‘लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दीवर्ष’, ‘हापूस आंबा’, ‘बापू स्मृती’ या चित्ररथांनी १९९३ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. सर्वप्रथम १९७१मध्ये वारली दिंडीच्या संकल्पनेवर आधारित चित्ररथ राजपथावर सादर झाला. त्यानंतर १९८०मध्ये ‘शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक’ व १९८३मध्ये ‘बैल पोळा’या संकल्पनेवरील चित्ररथाने प्रथम पारितोषिक पटकावले होते. ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ या चित्ररथास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले होते. १९८८मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ला द्वितीय, २००७मध्ये ‘जेजुरीचा खंडेराय’ला तृतीय तर २००९मध्ये ‘धनगर’ या चित्ररथास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. (विशेष प्रतिनिधी)