शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चार बाजार समित्या बरखास्त

By admin | Updated: November 11, 2014 23:18 IST

प्रशासक नियुक्त : तासगाव, पलूस, विटा, आटपाडीचा समावेश

सांगली/तासगाव/आटपाडी/विटा : सहकार विभागाने दिलेल्या आदेशाने सांगली जिल्ह्यातील तासगाव, पलूस, विटा-खानापूर आणि आटपाडी या चार कृषी उत्पन्न बाजार समित्या मंगळवारी बरखास्त करण्यात आल्या. जिल्ह्यातील चार सहाय्यक निबंधकांनी प्रशासक म्हणून या समित्यांचा कार्यभार हाती घेतला असून, पुढील आदेश येईपर्यंत आता प्रशासकांच्याच हाती समित्यांचा कारभार राहणार आहे. शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचे केंद्र व राजकारणाचा अड्डा बनलेल्या या समित्यांना सहकार विभागाने दणका दिला आहे. जिल्ह्यातील चार बाजार समित्या बरखास्त करण्याचे आदेश मंगळवारी जिल्हा उपनिबंधकांना प्राप्त झाले. त्यानुसार चारही बाजार समित्या तातडीने बरखास्त करून त्याठिकाणची सूत्रे प्रशासकांच्या हाती सोपविण्यात आली आहेत. या चारही बाजार समित्यांची मुदत यापूर्वीच संपली आहे. यातील मंडळांना वारंवार मुदतवाढ देण्यात आली होती. चारही बाजार समित्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. तासगावमध्ये राष्ट्रवादीचे, विटा-खानापूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे संयुक्त, पलूस समितीत काँग्रेसचे, तर आटपाडी समितीत राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. चारही बाजार समित्यांमधील वार्षिक उलाढाल पाचशे कोटींच्या घरात आहे. त्यामुळे सहकार विभागाच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बरखास्त झालेल्या चार समित्यांमध्ये सर्वात मोठी समिती म्हणून तासगावचा उल्लेख होतो. याठिकाणी वार्षिक सव्वाचारशे कोटी रुपयांची उलाढाल होते. ज्यावेळी या बाजार समितीची निवडणूक झाली होती, त्यावेळी याठिकाणी माजी मंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील एकत्रच राष्ट्रवादीत होते. त्यामुळे या बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. एकूण २१ जणांचे मंडळ अस्तित्वात होते. त्यातील दोन स्वीकृत सदस्य होते. निवडून आलेल्यांमध्ये आर. आर. पाटील गटाचे १३, तर संजय पाटील गटाचे ६ सदस्य समितीवर होते. तासगाव समितीची मुदत १ मे २0१३ ला संपली असताना, त्यानंतर १८ महिने सातत्याने मंडळाला मुदतवाढ मिळाली. (प्रतिनिधी)सहकार विभागाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणीजिल्हा उपनिबंधक कार्यालयाने संबंधित बाजार समित्यांवर सहकार विभागाच्या आदेशानुसार प्रशासक नियुक्ती केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत याठिकाणी प्र्रशासकांमार्फत कारभार पाहिला जाईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. एस. एन. जाधव यांनी दिली. आता प्रशासकराजबाजार समित्या बरखास्तीनंतर तासगावसाठी सहा. निबंधक शंकर पाटील, पलूससाठी श्रीमती पी. बी. कोळेकर, विटा-खानापूर अमोल डफळे, तर आटपाडीसाठी विजया बाबर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. बाजार समित्यांची उलाढालसमित्या उलाढाल वर्चस्वतासगााव ४२५ कोटी राष्ट्रवादीखानापूर१.५ कोटी कॉँग्रेस-राष्ट्रवादीपलूस ६0 लाख कॉँग्रेसआटपाडी २५ कोटी राष्ट्रवादी