शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात चार; तर विदर्भात दोन आत्महत्या

By admin | Updated: April 5, 2016 02:20 IST

सततची नापिकी आणि कर्जामुळे जालना तीन, औरंगाबाद जिल्ह्यातील एक आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यााचे सोमवारी समोर आले.

औरंगाबाद /जालना/बुलडाणा : सततची नापिकी आणि कर्जामुळे जालना तीन, औरंगाबाद जिल्ह्यातील एक आणि बुलढाणा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यााचे सोमवारी समोर आले. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव येथील समाधान (पप्पू) राऊत (२६) याने रविवारी सायंकाळी शेतातील विहिरीतील लोखंडी गर्डरला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर याच तालुक्यातील वरूड बु. येथील सुरेश किसन गिरी (४५) यांनी सोमवारी शेतातील घरात गळफास घेऊन जीवन संपविले. तिसरी घटना जालना शहरात सोमवारी दुपारी रेल्वे उड्डाणपुलाखाली घडली. अंबड तालुक्यातील बनटाकळी येथील रहिवासी बबन भानुदास भडांगे यांनी या पुलाखाली विषारी द्रव सेवन केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भडांगे यांच्यावर ५० हजार रूपयांचे ग्रामीण बँकेचे कर्ज होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.औरंगाबाद तालुक्यातील शेवगा येथील अजिनाथ कोरडे (२६) या शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी शेतात विष घेतले होते. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला. कोरडे यांना पंधरा दिवसांपूर्वीच मुलगा झाला होता. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माटरगाव येथील बंडू किसन मालठाणे (४५) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मोमिनाबाद येथील सुधाकर राजाराम कळमकार (३५) यांनी रविवारी सायंकाळी शेतातच विष घेतले होते.