शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

अकोल्यात सव्वा चार लाखांची रोकड जप्त

By admin | Updated: October 13, 2014 05:24 IST

कृषी विद्यापीठासमोरील जकात नाक्यावर निवडणूक विभागाच्या पथकाने रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास एका पेट्रोलपंप मालकाच्या कारमधून ४ लाख २७ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली

अकोला : कृषी विद्यापीठासमोरील जकात नाक्यावर निवडणूक विभागाच्या पथकाने रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास एका पेट्रोलपंप मालकाच्या कारमधून ४ लाख २७ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली; परंतु ही रोख पेट्रोल विक्रीची असल्याचे स्पष्ट झाले. ही रोकड सिव्हिल लाईन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. नरेश अग्रवाल यांचा शिवणी येथे पेट्रोलपंप असून, रविवारी दुपारी ते पेट्रोलपंपावर गोळा झालेली ४ लाख २७ हजार ५०० रुपयांची रोख घेऊन इंडिकाने घराकडे येत होते. दरम्यान, त्यांची कार निवडणूक विभागाच्या पथकाने जकात नाक्यावर अडविली. कारची तपासणी केली असता रोकड मिळून आली. अग्रवाल यांनी ही रोख पेट्रोल विक्रीची असून, त्याचा हिशेबही पेट्रोलपंपावर असल्याचे सांगितले; परंतु त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना थेट सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात आणले आणि ही रोकड निवडणूकसंबंधी आणली असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. ही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून, सोमवारी पेट्रोल विक्रीचा हिशेबाची कागदपत्रे दिल्यानंतर रोख त्यांना परत देण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)