कोल्हापूर : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांची भीतीने गाळण उडाली ती, बिबट्याला रस्त्यावर फिरताना पाहून! येथील रुईकर कॉलनी, महाडिक माळ परिसरात गुरुवारी सकाळी तब्बल चार तास बिबट्याची भ्रमंती सुरू होती. तासांनी त्याला पकडण्यात यश आले. परंतु दुपारनंतर त्याचा मृत्यू झाला. सकाळी ७ वाजता सुरू झालेली बिबट्या पकडण्याची ही मोहीम अखेर ११ वाजून ४० वाजता संपली. असे केले जेरबंद... काही तरुणांनी बिबट्याला पकडण्यास डुकरे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळीचा वापर केला. मात्र त्याचवेळी बिबट्याने हल्ला केला. त्यात दोघे तरुण जखमी झाले. चवताळलेला बिबट्या तेथून सुटला असता तर काहीतरी अघटित घडले असते; म्हणून वीसहून अधिक धाडसी तरुणांनी जाळीसह बिबट्याच्या अंगावर उड्या घेतल्या.
कोल्हापुरात चार तास बिबट्याचा थरार
By admin | Updated: January 2, 2015 02:43 IST