शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेतील चार मजली इमारत जमीनदोस्त

By admin | Updated: March 2, 2017 02:43 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको व महापालिकेने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिडको व महापालिकेने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत बुधवारी कोपरखैरणे, सेक्टर १२ येथील एक चार मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. तसेच याच परिसरातील सेक्टर ९मध्ये सिडकोच्या जागेवर उभारलेल्या काही बेकायदा झोपड्यांवरही या वेळी कारवाई करण्यात आली. अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा सिडकोचे मुख्य अनधिकृत बांधकाम नियंत्रक शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.कोपरखैरणे सेक्टर १२मध्ये इ. बा. पटेल यांनी संबंधित विभागाची कोणतीही परवानगी न घेता तळमजला अधिक चार मजल्याची इमारत उभारली आहे. सध्या या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले होते. त्यामुळे सिडको आणि महापालिकेने या बांधकामाला नोटीस बजावली होती; परंतु संबंधित बांधकामधारकाने त्यास कोणताही प्रतिसाद न दिल्याने बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यावर कारवाई करण्यात आली. तसेच याच परिसरातील सेक्टर ९मध्ये बालाजी थिएटरच्या समोरील मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात बेकायदा झोपड्या उभारल्या आहेत. त्यावरही या वेळी कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, या झोपड्यांवर यापूर्वीही अनेकदा कारवाई केली होती. या कारवाईप्रसंगी सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक पी. बी. राजपूत, सहायक बांधकाम नियंत्रक गणेश झिने, तसेच महापालिकेचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे, कोपरखैरणे विभाग अधिकारी अशोक मढवी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)