शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाटात दोन अपघातांत चार ठार

By admin | Updated: June 18, 2016 01:41 IST

माळशेज घाटातील शिसेवाडी आणि आवळेची वाडी वळणावर शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार, तर सहा जण जखमी झाले. दोन्ही अपघात पिकअप गाड्यांनी दिलेल्या धडकेमुळे झाले आहेत.

शिरोशी : माळशेज घाटातील शिसेवाडी आणि आवळेची वाडी वळणावर शुक्रवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत चौघे ठार, तर सहा जण जखमी झाले. दोन्ही अपघात पिकअप गाड्यांनी दिलेल्या धडकेमुळे झाले आहेत.यातील पहिला अपघात शिसेवाडी वळणार झाला. जांभळे घेण्यासाठी निघालेल्या प्रदीप अनंता पठारे, योगेश दगडू भेगडे यांच्या दुचाकीला कल्याणहून नगरकडे जाणाऱ्या पिकअप गाडीने शिसेवाडी वळणावर धडक दिली. त्यात ते दोघे गंभीर जखमी झाले. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला जांभळे विकणाऱ्या कुशीबाई देऊ वाख (५२), उषा किसन वाख (१०) या दोघींच्या अंगावरूनही पिकअप गाडी गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. या अपघातात पिकअपमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात ओझरच्या सुनंदा कवडे या महिलेचा समावेश असून, अन्य चौघांची नावे समजू शकली नाहीत.दरम्यान, आवळेची वाडी येथील वळणावर समोरून येणाऱ्या इनोव्हा कारची धडक चुकविण्याच्या नादात पिकअपची दुचाकीला धडक बसून डोंगरवाडी येथील दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. केशव वाघ (२५) आणि केशव पोकळा (२३) अशी मृतांची, तर कैलास खाकर असे जखमीचे नाव असून, त्याला उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)