शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
3
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
4
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
5
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
6
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
7
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
8
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
9
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
10
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
11
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
12
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
13
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
14
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
15
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
16
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
17
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
18
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
19
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
20
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?

दोन अपघातांत नऊ जण ठार, साखरपुड्यासाठी जाताना औरंगाबादच्या चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 04:57 IST

राज्यात सोमवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तब्बल नऊ जणांचा बळी गेला

कोल्हापूर/औरंगाबाद : राज्यात सोमवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत तब्बल नऊ जणांचा बळी गेला. त्यापैकी निपाणी येथे मालवाहू बोलेरो आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद येथे कार उलटून झालेल्या अपघातात साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या नियोजित नवरदेवासह चौघे ठार झाले.कर्नाटकातील घटप्रभा येथून भाजीपाला घेऊन कोल्हापूरला येत असताना टायर फुटल्याने मालवाहू बोलेरो जीप दुभाजकाला धडकून पलीकडच्या रस्त्यावरील आयशर टेम्पोला समोरून धडकली. पुणे-बंगलोर महामार्गावर निपाणी येथील ईदगाह मैदानासमोर झालेल्या या भीषण अपघातात शब्बीर करीम सय्यद-बागवान (२८), नदीम इसाक बागवान (२४), फय्यूम सलीम बागवान (२०), या कोल्हापूरच्या तीन भाजी विक्रेत्यांचा; तसेच राजमहमद अब्दुलगफार बागवान (३०) व आयशर टेम्पोचालक रमेश बसाप्पा (४६) या बेळगावातील दोघांचा मृत्यू झाला. टेम्पोचा क्लिनर आनंद लम्माणी (२०, बेळगाव) हा जखमी असून त्याच्यावर निपाणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुसºया घटनेत जालना रोडवरील करमाडनजीकच्या सटाणा फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटून कारने रस्त्यावर सात ते आठ वेळा कोलांट्या घेतल्या. या अपघातात औरंगाबादेतील राजा ऊर्फ शहजाद युनूस शेख (२३), तबरेज खान राजू खान (२६), शेख महंमद मुजफरोद्दीन वाहिजोद्दीन शेख (२६), अबुदबीन हसनबीन समेदा (२५) या मित्रांचा मृत्यू झाला. तसेच कारचालक उमर चाऊस हसनबीन समेदा (२४) आणि शफिक खान शमीम खान (२४) हे दोघे गंभीर जखमी झाले.पुण्यातही चौघे ठार : पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कारची उभ्या ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात चौघे ठार झाले. ओंकार पोळ (२७, शिंदेवाडी, भोर, मूळ रा. सांगली), अश्विनी आसवल (३६, पुणे), उज्ज्वला सणस (३५, पुणे), अरुणा भोसले (३५) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी साताºयाला चालले होते.मैंदर्गीहून अक्कलकोटकडे (जि. सोलापूर) भरधाव येणाºया ट्रकची धडक बसून रस्ता ओलांडणारा युवक ठार झाल्याची घटना बोरीउमरगे (ता. अक्कलकोट) बसस्थानकात घडली. सिद्धाराम खंडू पुजारी-बºहाणपुरे असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर पळून जाणाºया देवेंद्र व्ही. विजयकुमार (३१, वेल्लोर, तामिळनाडू) या ट्रकचालकाला लोकांनी पाठलाग करून पकडले.