शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चार बालगोविंदा रुग्णालयात दाखल

By admin | Updated: August 27, 2016 01:41 IST

यंदा दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या बालगोविंदांपैकी ४ बालगोविंदा जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले

मुंबई : यंदा दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या बालगोविंदांपैकी ४ बालगोविंदा जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. उल्हासनगरमध्ये दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या १२ वर्षीय सुजल गडापकर याला जबर मार बसला आहे. हंडी फोडताना पडल्यामुळे सुजलच्या डोक्याला आणि छातीला मार बसला आहे. प्राथमिक उपचार झाल्यावर त्याला पुढील उपचारांसाठी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री उशिरा सीटीस्कॅन आणि अन्य काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे समजते. जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १३ आणि १५ वर्षांच्या बालगोविंदांवर सध्या उपचार सुरू आहेत. १५ वर्षीय हिमांशू पटेल याच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तर १३ वर्षीय गणेश याच्या डोक्याला आणि डोळ्याला मार बसला आहे. डोक्याला मार बसला असल्यामुळे त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली. (प्रतिनिधी)नऊ वर्षांचा धीरज हा बुधवारी रात्रीच जखमी झाला आहे. धीरजला उपचारांसाठी कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री सराव शिबिरात दहीहंडी फोडताना त्याच्या डोक्याला मार लागला. चाचण्यांनंतर त्याच्या कवटीला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आहे.