शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गणोशाची राजमहालात स्थापना

By admin | Updated: September 2, 2014 00:04 IST

येथील खेवरा सर्कलमध्ये दरवर्षी एक वेगळी कलाकृती घेऊन साकारणा:या मनोमय फाऊंडेशन सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने यंदा भव्य राजमहालाचा देखावा साकारला आहे.

जितेंद्र कालेकर - ठाणो 
येथील खेवरा सर्कलमध्ये दरवर्षी एक वेगळी कलाकृती घेऊन साकारणा:या मनोमय फाऊंडेशन सार्वजनिक गणोशोत्सव मंडळाने यंदा भव्य राजमहालाचा देखावा साकारला आहे. पाच हजार चौरस फुटांच्या या महालात लालबागच्या राजाची प्रतिकृतीची 11 फूट गणोशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. भव्य तरीही शिस्तप्रिय मंडळ अशी ख्याती असलेल्या या मंडळाकडे यंदाही परिसरातील हजारो  भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
ठाणो महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणोकर नाटय़गृहापासून जवळच असलेल्या या मंडळाचा राजमहाल यंदाही भाविकांचे आकर्षण ठरला आहे. 2क्क्5 मध्ये स्थापलेल्या या मंडळाचे यंदाचे नववे वर्ष आहे. 
दिनेश चौरसियांच्या 5क् जणांच्या टीमने दीड महिन्यात हा राजमहाल उभारला आहे. 
मंडपाची रुंदी 4क् तर लांबी 5क् फूट आहे. यामध्ये 14 फूट उंचीचे 16 खांब असून या खांबांसह ¨भंतीवर उत्कृष्ट कलाकुसर करण्यात आली आहे. आकर्षक रंगसंगती, पडदे आणि एकूणच सर्व भव्यता पाहून आपण एखाद्या राजमहालात आल्याचा भास या ठिकाणी होतो. विशेष म्हणजे खड्डेविरहित मंडप उभारण्याची गेल्या चार वर्षाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. केवळ लोखंडी अँगलच्या आधारे नट-बोल्टच्या फिटिंगने मंडप उभारला आहे. यंदा संपूर्ण एलएडी दिव्यांचा वापर केल्यामुळे प्रखर उजेडाबरोबर विजेची बचतही होत आहे. शिवाय, या दिव्यांमुळे भाविकांना दाहकतेचाही त्रस होत नाही. दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने या देखाव्याच्या सुंदरतेमध्ये आणखीनच भर पडली आहे. बांधकाम व्यावसायिकांसह अनेक बडय़ा व्यावसायिकांच्या दातृत्वामुळे मंडळाकडे सहा लाखांची वर्गणी जमा झाली आहे. दानपेटीतही साधारण साडे तीन ते चार लाखांची रक्कम जमा होते.  
दानपेटीतील रकमेसह वर्गणीचा सर्वच हिशेब काटेकोरपणो ठेवून त्यात पारदर्शकता ठेवली जाते. यंदा राजमहालाचा मंडप, डेकोरेशन आणि रोषणाईसाठी 1क् लाखांचा खर्च करण्यात आला आहे. त्यातही नुसत्या मंडपासाठी साडेसहा लाख तर मूर्तीसाठी 4क् हजारांचा खर्च झाला आहे. लालबागच्या राजाची मूर्ती साकारणारे संतोष कांबळी यांनीच ही मूर्तीदेखील साकारली आहे. त्यामुळे या मूर्तीकडे पाहिल्यावर लालबागच्या गणोशाची आठवण येतेच, इतकी साम्यता या दोन्ही मूर्तीमध्ये आहे. 
 
परदेशी पर्यटकांचीही हजेरी
मंडळाच्या ख्यातीमुळे परदेशी पर्यटकही येथे आवजरून हजेरी लावतात. गणोशापुढे ठेवण्यात येणारी शेकडो फळे परिसरातील महापालिका शाळेच्या हजारो विद्याथ्र्याना वाटली जातात. या ठिकाणी रोज होणा:या मराठीसह बहुभाषिक भजनांमुळे सर्व भाषिक भाविक या मनोमयच्या गणोशाला दर्शनासाठी येत असल्याचे पदाधिकारी सांगतात.
 
सलग पाचवे पारितोषिक
मंडळाने अधिकृत मीटरद्वारे वीजजोडणी घेतली आहे. विसर्जन मिरवणुकीतही गुलालाऐवजी पुष्पवृष्टी केली जाते. तसेच डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा उपयोग करण्यात येतो. ध्वनिक्षेपकाचा आवाजही मर्यादित असल्यामुळे या मंडळाला पोलीस उपायुक्त कार्यालयानेही सलग पाचव्यांदा पहिले पारितोषिक देऊन गौरविले आहे. 
 
सुरक्षेचीही खबरदारी : मंडळाने सुरक्षेच्या दृष्टीने पाच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे ठेवले आहेत. त्यासाठी 24 तास कर्मचारी ठेवले असून चार सुरक्षारक्षकांचीही नियुक्ती केली आहे. याशिवाय, अग्निप्रतिबंधक उपाययोजनाही करण्यात आली आहे.