शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त ओव्हरलोड ट्रकचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 04:33 IST

नादुरुस्त झालेला ओव्हरलोड ट्रक अचानक उतारावर ४०० ते ५०० फूट मागे जाऊन दोन मोटारी, एक छोटा मालवाहू टेम्पो,

कुरुळी (जि. पुणे) : नादुरुस्त झालेला ओव्हरलोड ट्रक अचानक उतारावर ४०० ते ५०० फूट मागे जाऊन दोन मोटारी, एक छोटा मालवाहू टेम्पो, एक दुचाकी व पानटपरीला धडक देऊनच थांबला. या घटनेत रस्त्यालगत मोटारीत हवा भरण्यासाठी उभा असलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.हा थरारक प्रकार पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कुरुळीफाटा (ता. खेड) येथे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. अब्दुल उर्फ ए. जे. मोमीन (वय ४८, सध्या रा. जय गणेश साम्राज्य, पांजरपोळ भोसरी, मूळ रा. बागेवाडी, जि. विजापूर,कर्नाटक) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सविता मनोजकुमार टंडन (वय ३९, रा. पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक चंद्रा पी. कुशवाहा (वय २५,रा. धुमनगंज अलाहाबाद, उत्तर प्रदेश) याच्यावर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कुरुळीजवळील सोनवणेवस्ती येथे अवजड मालाने भरलेला ट्रक अचानक मागे येऊ लागला. भरधाव जाणाऱ्या एका मोटारीला या ट्रकने धडक दिली. त्यानंतर एका छोटा मालवाहू टेम्पोला धडक दिली. यानंतर ट्रकने होंडा सिटी मोटारीला धडक दिली. रस्त्याच्या दुभाजकाला आदळून या ट्रकने रस्त्यालगत हवा भरण्यासाठी उभ्या असलेल्या मोटारीला धडक दिली. लगतच असलेल्या श्लोक पान स्टॉलवर हा ट्रक धडकल्यानंतर थांबला. पान स्टॉलचालक सोपान तावडे याने वेळीच बाहेर उडी मारल्याने तो थोडक्यात बचावला. (वार्ताहर)