शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

संक्रमण शिबिरात चाळीस वर्षांचा वनवास  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 06:55 IST

धोकादायक इमारत, प्रकल्पग्रस्त म्हणून संक्रमण शिबिरात कोंबले. हक्काच्या घरात जाण्याच्या प्रतीक्षेत एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल चाळीस वर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात काढण्याची वेळ घाटकोपरच्या पंतनगर येथील ४९६ कुटुंबांवर आली आहे.

मुंबई : धोकादायक इमारत, प्रकल्पग्रस्त म्हणून संक्रमण शिबिरात कोंबले. हक्काच्या घरात जाण्याच्या प्रतीक्षेत एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल चाळीस वर्षे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात काढण्याची वेळ घाटकोपरच्या पंतनगर येथील ४९६ कुटुंबांवर आली आहे. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असतानाच याच ठिकाणी हक्काच्या घरांसाठी त्यांनी लढा सुरू केला आहे.घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर परिसरात जवळपास म्हाडा संक्रमण शिबिराच्या ५० चाळी असून प्रत्येक चाळीत ८ खोल्या आहेत. २५ वर्षांपूर्वी येथील ८ चाळी तोडून त्या ठिकाणी इमारत उभी राहिली. या इमारतीत त्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले. तर उर्वरित ४२ चाळींत ४९६ कुटुंबे राहताहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही मंडळी चाळीस वर्षांपासून येथेच आहेत.याच वसाहतीत राहत असलेले ७० वर्षांचे चंद्रकांत रत्नपारखी यांनी याच ठिकाणी घराला घर मिळावे म्हणून लढा उभारला. कामाठीपुरा परिसरात राहत असलेल्या पारखी यांचे १० आॅगस्ट १९७६ रोजी अवघ्या पाच वर्षांच्या करारावर या संक्रमण शिबिरात पुनवर्सन केले. मात्र हक्काच्या घरात जाण्याच्या प्रतीक्षेत २० वर्षे उलटली. अखेर त्यांनी पंतनगर संक्रमण शिबिर रहिवासी संघ स्थापन करत याच ठिकाणी घर मिळावे म्हणून पाठपुरावा सुरू केला. १९९७ मध्ये विकासक धर्मेश जैन यांच्या मदतीने त्यांनी म्हाडाकडे पुनर्विकासासाठी पाठपुरावा सुरू केला. म्हाडाकडून १९९९ मध्ये जैन यांना येथील भूखंड पुनर्विकासाठी देण्यात आला. पण काही कारणांमुळे म्हाडाने तो भूखंड २००६ मध्ये त्यांच्याकडून काढून घेतला. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये पुन्हा भूखंडाच्या पुनर्विकासाबाबत जैन यांच्या बाजूनेच अध्यादेश मंजूर झाला. याबाबत जैन यांच्याशी संपर्क साधला असता, तो झाला नाही.रत्नपारखी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चाळीस वर्षांपासून मी येथे राहत आहे. या संक्रमण शिबिरात आयुष्य गेले. त्यामुळे याच ठिकाणी घराला घर मिळावे म्हणून २० वर्षांपासून लढत आहे. मात्र अजूनही हा लढा संपत नाही. प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला फक्त याच ठिकाणी घराला घर द्यावे एवढीच विनंती. विकासक कोणीही असो, आम्हाला फक्त हक्काचे घर हवे. आता इथून पुढे पुन्हा दुसरीकडे राहणे शक्य नाही.पुनर्विकासाच्या नावाखाली रस्त्यावर...चाळीतून इमारतीत जाण्याचे स्वप्न रंगविले, विकासक आला. त्याने अवघ्या दोन वर्षांत इमारतीतील हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न दाखविले. मात्र हे स्वप्न फक्त स्वप्नच राहिले, असे २० वर्षांपासून या संक्रमण शिबिरात राहत असलेल्या लीला चव्हाण यांनी सांगितले.पुनर्वसन केलेल्यांचेही जीव धोक्यात...संक्रमण शिबिरात बांधलेल्या दोन इमारतींची मोठी दुरवस्था झाली आहे. तेथील रहिवासी मेहताब शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीची कोणतीही दुरुस्ती किंवा देखभाल केलेली नाही. त्यामुळे ती कधीही कोसळू शकते. इमारतीचे भाग कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत.